सहा महिन्यांपासून फरार अन् सोळा गुन्हे दाखल असलेल्या सराईत चंदन तस्कराला अटक

शिक्रापूर:- शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अण्णा लक्ष्मण गायकवाड याला मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा,पुणे यांनी जेरबंद केले आहे.पुढील तपासासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करणार आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(दि १७) रोजी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक covid -19 चे अनुषंगाने पुणे-नगर रोडवर पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिक्रापूर पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपी अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय ३६ रा.घोडेगाव ता.नेवासा जि. अहमदनगर) हा सतरा कमान चौक येथे आलेला आहे लगेच तिथे जाऊन चौकशी केली असता घोडनदी पुलाजवळ एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला त्याठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्यांचे अण्णा लक्ष्मण गायकवाड असे सांगितले तसेच इथे थांबले बाबत विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली असता त्याचे पूर्व रेकॉर्ड पाहिले असता त्यांचेवर या पूर्वीचे एकूण १६ गुन्हे दाखल असून तो शिक्रापूर पो स्टे गु र नं.६६५/२०२० भा द वि कलम ३७९ वन अधिनियम १९२७ चे कलम ४१,४२(ब) या गुन्ह्या मध्ये पाहिजे आहे.त्या नुसार आरोपी अण्णा लक्ष्मण गायकवाड याला वैद्यकीय तपासणी करून शिक्रापूर पोलिसांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट याचे मार्गदर्शनाखाली पोसई अमोल गोरे,सहायक फोजदार दत्ता जगताप, पो कॉ बाळासाहेब खडके,अक्षय नवले,प्रसन्नी घाडगे,अक्षय जावळे यांच्या पथकाने केली

Previous articleभीमाशंकर परिसरात वादळात अनेक घरांचे नुकसान
Next articleकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात