श्रीप्रयागधाम हॉस्पिटलमध्ये लवकरच ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देऊ – खासदार डॉ अमोल कोल्हे

पुणे-शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज लागत आहे. या अनुशंघाने श्री प्रयागधाम हॉस्पिटलमध्ये लवकरच ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देऊ. असे, आश्वासन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिले आहे.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी (ता. १५) आढावा बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आश्वासन दिले.

 

यावेळी हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा परिषदेच्या सदस्या किर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, राजेंद्र कांचन, अमित कांचन, प्रियंका कांचन, अजिंक्य कांचन, सीमा कांचन, सुभाष बगाडे, सुनिल तांबे, सागर कांचन, शंकर बडेकर, जितेंद्र बडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. संचेता कदम, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतीबंधानात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे सुरु आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे. सद्या रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड व रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होत आहे. रेमडेसिव्हीरच्या एका इंजेक्शनची सुमारे ९५० रुपये तर दुसऱ्या इंजेक्शनची १४०० रुपये किंमत आहे. जर यापेक्षा जास्त किंमतीने कोणी इंजेक्शन विकले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. असे डॉ. कोल्हे यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, खासदार डॉ. कोल्हे यांनी कोरेगावमूळ येथील कोव्हीड सेंटर व उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तसेच त्यांनी कोरोना रुग्णांशी बोलून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तसेच त्यांनी उरळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. आणि कोरोना रुग्णांची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचारी यांना प्रोत्साहन दिले.

कोरोना रुग्णांची लवकरात लवकर चाचणी होऊन त्यांना आर टी सी टी टेस्ट साठी लोणी काळभोर या ठिकाणी जावे लागत आहे. या टेस्टद्वारे रुग्णांना कोरोनाचा स्कोर समजला जातो. यामुळे उरुळी कांचन येथील नागरिकांसाठी एक आर टी सी टी टेस्ट केंद्र उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना केली आहे.

२) संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग हा उरुळी कांचन गावातून जात आहे. या रस्त्याचा पालखी महामार्ग मध्ये समाविष्ट करून रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात यावे. तसेच उरुळी कांचन ग्राम सचिवालयासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी सरपंच संतोष कांचन यांनी केली आहे.

खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली नातेवाइकांकडून जास्त पैसे घेत आहे. आशा खाजगी दवाखान्यांवर प्रशासनाच्या वतीने ऑडिट करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य संतोष कांचन यांनी केली आहे.

Previous articleमहाळूंगेत २६ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार ; उपचारा दरम्यान तरूणाचा मृत्यू
Next articleखतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार -जयंत पाटील