महाळूंगेत २६ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार ; उपचारा दरम्यान तरूणाचा मृत्यू

चाकण- औद्योगिक वसाहतीतील महाळूंगे  गावच्या हद्दीत असणाऱ्या एका कंपनीत पाण्याचा टँकर पुरवण्याच्या वादातून सहा हल्लेखोरांनी एका व्यावसायिक तरुणावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

अक्षय अशोक शिवळे, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव ( सर्व रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) व अन्य तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपींनी पसार झाले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि.१४ मे) रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास महाळुंगे (ता. खेड) येथील रेणुका हॉटेल समोर घडली. या हल्ल्यात अतुल तानाजी भोसले (वय २६, रा. भोसले वस्ती, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर चाकण येथील खाजगी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चिंचवड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज (दि. १५ मे ) रोजी  पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला .याबाबत मित्र अक्षय पंडित बोऱ्हाडे (वय २६, रा. महाळुंगे ) याने काल हल्ला झाल्यानंतर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अतुल भोसले व आरोपी अक्षय शिवळे यांच्यात कंपनीला पाण्याचे टँकर पुरवण्यावरून फोनवरून बाचाबाची झाली होती. त्यामुळे आरोपींनी चिडून जाऊन हे कृत्य केले.

.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टपल्ले, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश आढारी, पो.ह. बाळसराफ, पो.ह. हणमंते यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.

Previous articleकोरोना नंतरचे पर्यटन आणि उपाययोजना” या विषयावर दिपक हरणे यांचे मार्गदर्शन
Next articleश्रीप्रयागधाम हॉस्पिटलमध्ये लवकरच ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देऊ – खासदार डॉ अमोल कोल्हे