दौंडमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

दिनेश पवार,दौंड

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरती दौंड पोलीसांच्या वतीने धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. विनाकारण फिरणे,मास्क न वापरणे,गर्दी करणे, अत्यावश्यक सेवेत नसताना देखील फिरणे,वाहतुकीचे नियम न पाळणे अशावरती कारवाई करण्यात येत आहे.दौंड शहर तसेच ग्रामीण भागात देखील कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे,दौंड तालुक्यातील काही गावे हॉटस्पॉट म्हणून देखील जाहीर करण्यात आली आहे.

वाढता कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलीस,आरोग्य विभाग सतत वेगवेगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत,सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सुविधा साठी नागरिक बाहेर येतात मात्र दिलेली वेळ होऊन गेली तरी गर्दी सर्वत्र दिसून येते.तसेच शनिवार आणि रविवार या दिवशी बंद असताना सुद्धा नागरिक फिरताना दिसत होते.यावरती आता कडक कारवाई करण्यात येत आहे, नागरिकांनी सहकार्य करावे,विनाकारण फिरू नये,मास्क,सॅनिटायजर चा वापर करावा आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

Previous articleउद्योजक राजेश कोतवाल यांच्या कडून कोविड सेंटरला २५००० हजाराचा धनादेश
Next articleदिपक सोनवणे यांची दक्षता समितीवर निवड