उरूळी कांचन येथे रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन

अमोल भोसले

ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, ग्रामपंचायत उरुळी कांचन, प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिंक्य फाउंडेशन, हवेली तालुका पत्रकार संघ, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, महात्मा गांधी सर्वोदय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक जाणिवेतून सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात रक्त आणि प्लाझ्मा या आवश्यक घटकांचा तुटवडा निर्माण झालेला असल्याने राज्य शासनाच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून प्लाझ्मादान शिबिर गुरुवार ( दि.१३) रोजी सकाळी नऊ ते तिन दरम्यान महात्मा गांधी विद्यालयाच्या रवींद्र कला मंदिर याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

प्रत्येक रक्तदात्यास झाड ,प्रशस्तीपत्रक व अजिंक्य फाउंडेशनच्या वतीने वाफेचे मशीन भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विशेष सहकार्य सिध्दीविनायक हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल, गणराज हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल, झेडप्लस हॉस्पिटल यांचे लाभणार आहे.

दर रविवारी उरुळी कांचन परिसरातील परिसर स्वच्छता अभियान गुप्रव्दारे स्वच्छ केला जात आहे. नागरिकांना शिस्त लागवी व स्वच्छ माझा परिसर स्वच्छ माझे गाव या संकल्पनेतून उच्चशिक्षित धेय्यवेडी तरुण वर्ग एकत्रित येऊन अनेक सामाजिक उपक्रम आजपर्यंत घेतले आहे. वृक्षारोपण त्यांचे संगोपन तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन मध्ये दुपारी विश्रांतीला असल्याने पालखी पुढे मार्गक्रम झाल्या नंतर जो कचरा ठिकठिकाणी साचतो ते सर्व दोनशे तरुण एका मेसेज व्दारे एकत्र येऊन एक तासात पूर्वी प्रमाणे स्वच्छ केले जाते.

Previous articleलोणी काळभोर – पोलिसांच्या मदतीला तीस विशेष पोलिस अधिकारी
Next articleएमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उद्या १३ मे रोजी संवाद साधणार…