लोणी काळभोर – पोलिसांच्या मदतीला तीस विशेष पोलिस अधिकारी

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे पोलीसांना दैनंदिन कर्तव्यात मदत करणेसाठी उरुळी कांचन, शिंदवणे, वळती, कोरेगावमुळ, सोरतापवाडी, टिळेकरवाडी येथील होतकरु तरुणांना विशेष पोलीस आधिकारी म्हणून घेण्यात आले आहे. त्यांना विशेष पोलीस आधिकारी असे सिम्बॉल असलेले टी शर्ट व टोपी इत्यादी साहित्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विशेष पोलीस आधिकारी म्हणून नेमलेल्या तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केले.

विशेष पोलीस आधिकारी यांची स्वयंस्फूर्तपणे साथ मिळाल्याने गस्त – नाकाबंदी ही कामे अधिक परिणामकारक व प्रभावीपणे राबविणेसाठी पोलिसांना मदत मिळणार आहे. सदरची विशेष पोलीस आधिकारी कार्यरत करणेची संकल्पना पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते, लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरिक्षक गुन्हे लोणी काळभोर सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वीत करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तसेच बीट मार्शल असे मिळून विशेष पोलीस आधिकारी हि योजना प्रभावीपणे राबवीत आहेत.

यावेळी पोलीस पाटील वर्षा कड, पोलीस पाटील विजय टिळेकर, पोलीस पाटील मोहन कुंजीर, पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सुरेश वाळेकर, बापुसाहेब लाड, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे उपस्थित होते.

Previous articleसाहित्यिक व कलावंत मानधन जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी हभप.आनंद तांबे महाराज
Next articleउरूळी कांचन येथे रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन