एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उद्या १३ मे रोजी संवाद साधणार…

Ad 1

पुणे- 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन संचालनालय आणि अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही कृषी आणि पर्यटन विषयातील तज्ञ, अभ्यासू मान्यवरांचे अनुभव आणि मार्गदर्शन या परिसंवादात ऐकायला मिळणार आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस या महामारी चे मोठे संकट आलेले आहे. उभ्या जगाशी गनिमी कावा खेळणाऱ्या या दुष्ट विषाणु मुळे आपला भारत, महाराष्ट्र ही प्रभावित झालेला आहे. या संकटामुळे पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे. पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. तथापि, यातुन पर्यटनासाठी वेगवेगळया संकल्पना राबवुन मार्ग काढावा लागणार आहे. शासनाने यापुर्वी कृषी पर्यटन धोरण जाहीर केलेले असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी पर्यटनातुन प्रगती करणे शक्य होणार आहे.

कृषी, संस्कृती आणि पर्यटन या विषयासंबंधी अॅग्रो टुरिझम विश्व प्रशिक्षण, कार्यशाळा, परिसंवाद सहली, संशोधन अहवाल प्रसिद्ध करत असते. कृषी पर्यटनाविषयी प्रचार व प्रसार करते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांमध्ये कृषी पर्यटनाबाबत जागृती करण्याचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन संचालनालय, अग्रो टुरिझम विश्व आणि अशा काही संस्था करत आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात अनेक प्रकारचे पर्यटन केले जाते. त्यामुळे कृषी पर्यटनातील संधी, गरज आणि भविष्य या विषयावर हा परिसंवाद असणार आहे.

कोरोनानंतरच्या पर्यटनासाठी उपाययोजना या विषयावर दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे हे आपले अनुभव कथन करणार असुन तरूण आणि कृषी पर्यटनामध्ये करीयर करण्यास इच्छुकांशी संवाद साधणार आहेत. कोरोना महामारीनंतर पर्यटन क्षेत्रास उर्जितावस्था आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करीत असलेले प्रयत्न याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

झूम या आँनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून परिसंवादाचे फायदे कृषी पर्यटन केंद्र चालक, कृषी पर्यटन केंद्र सुरू करू इच्छिणारे, पर्यटनातील विद्यार्थी, अभ्यासक आणि आवड असणाऱ्या सगळ्यांना होईल. सदरच्या परिसंवदामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी अॅग्रो टुरिझम विश्व च्या फेसबुकला भेट द्यावी, असे आवाहन अॅग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक गणेश चप्पलवार यांनी केले आहे.

सदरच्या परिसंवादात खालील लिंकला दि.13 मे दरम्यान दररोज संध्याकाळी 7 वाजता भेट देऊन परिसंवादा मध्ये सहभाग होता येणार आहे. सदरहु परिसंवादामध्ये सर्वांना भाग घेता येणार आहे.

Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/2609508015?pwd=ZGtYdkhvTGpUY1ljd2pBTHc2dzAyQT09

सदर बाबतच्या अधिक माहितीसाठी 9730023946 या भ्रमणध्वनी क्रंमांकावर संपर्क करता येईल.

सदर परिसंवादाचा लाभ सर्व कृषी पर्यटन केंद्र, पर्यटन व्यावसायिक आणि कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक, श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

Previous articleउरूळी कांचन येथे रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन
Next articleपोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांची कौतुकास्पद कामगिरी