माहिलेचा खून करून चोरी करणारा जेरबंद

अमोल भोसले

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भंगारच्या दुकानाच्या मालकीनीचा खून करून चोरी केल्याची घटना शनिवारी घडली. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पथकाने आरोपीला संगमवाडी (पुणे) येथून अवघ्या सहा तासाच्या आत अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.

अस्लम अली (वय-१९ वर्षे, रा. रामनगर, पुणे. मुळगाव मिरापुर, पोस्ट-गपुर, तहसील- बदलापुर. जि. जोनपुर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील खून, दरोडा, जबरीचोरी, अवैदय धंदे, बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगार तसेच शरीराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार यांचेवर कठोर कारवाई करून गुन्हयांचे व गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यासंदर्भातील धोरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्विकारले आहे. त्या अनुशंघाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या महिलेच्या खुनाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुप्ता यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ व दरोडा व पाहनचोरी विरोधी पथक क्रमांक १ यांना दिल्या होत्या.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेन्द्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ चे पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अमलदार राजेंद्र मारणे, संतोष सिरसागर, एकनाथ कंधारे, महेश निवाडकर, हनुमंत गायकवाड, रामदास गोणते, दिपक सिरसागर, विल्सन डिसोझा, सुजित पवार, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे तसेच दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक गुन्हे शाखा क्रमांक १ च्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस नाईक धनंजय ताजणे, अबुल मेंगे, गणेश पाटोळे व ऋषिकेश कोळप यांचे पथक तयार करण्यात आले.

पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेमधील दरोडा व दाहनचोरी विरोधी पथक १ व गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अधिकारी व अमलदार हे समांतर तपास करीत असताना गोपनिय माहितीच्या आधारे अफसर अली हा पूर्वी सदर महिलेकडे ४ ते ५ महिन्यापुर्वी तिच्या भंगाराच्या दुकानामध्ये काम करीत होता. अशी खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 चे पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना गोपनिय बातमी मिळाली होती.

आरोपी अस्लम अली हा खून व चोरी करून उत्तर प्रदेशकडे पलायन करणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलीस अंगलदार मेंगी जाधव यांनी आरोपीचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहिती काढून सदरचा आरोपी हा संगमवाडी येथून पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी आरोपीची उत्तरप्रदेश च्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीकडे चौकशी केली असता, आरोपी हा संगमवाडी (पुणे) येथून सिटी लिंक ट्रॅव्हल्सने जाणार असल्याची माहिती समोर आली.

सदर पथकाने आरोपी अस्लम अली याला संगमवाडी येथील ट्रॅव्हल्स पार्किंग क्रमांक ३ येथे सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या. आरोपीची तपासणी केली असता, त्याच्याकडून गुन्हा करताना वापरण्यात आलेली अंगावरची कपडे आणि इतर वस्तु बॅगमध्ये ठेवल्याचे आढळूनआले. पोलिसांनी आरोपीची बॅग जप्त केली आहे. तरी, पुढील तपासासाठी आरोपीला यूनिट ३ गुन्हे शाखा, यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Previous articleजामीअह मदरसा तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप
Next articleबुचकेवाडीत संघाच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य किटचे वाटप