जामीअह मदरसा तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

दिनेश पवार,दौंड- येथील जामीअह मखजनुल उलूम या मदरसा तर्फे गरजू लोकांना अन्न धान्य तसेच किराणा साहित्याचे वाटप दौंड पोलीस स्टेशनचे परि. पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक पालवे साहेब, आण्णासाहेब देशमुख, करसे साहेब उपस्थित होते.

गेली वर्ष भरापासून कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीतीला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन तसेच इतर काही प्रभावी योजना आखल्या जात आहेत, लॉकडाऊन मुळे ज्यांचे पोट हातावरती आहे, अशांना रोजगार च नसल्याने आर्थिक परिस्थिती कमकुवत बनत चालली आहे या परिस्थितीला सुधारण्यासाठी दौंड येथील मदरसा तर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, यापुढे ही असे उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे मौलाना हारून अबूबकर शेख यांनी सांगितले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोहेल रज्जक इनामदार,यांनी आर्थिक मदत केली तर उर्वरित मदत मदरसा तर्फे करण्यात आली,हरून शेख,अय्युब अबूबकर शेख,समीर शेख,साबीर शेख,हाफिज मुद्दसिर, सलमान शेख यांचे सहकार्य लाभले

Previous articleसरपंचाच्या अधिकारावर गदा आणल्यास विकासाला खीळ बसेल- शशिकांत मोरे
Next articleमाहिलेचा खून करून चोरी करणारा जेरबंद