बुचकेवाडीत संघाच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य किटचे वाटप

जुन्नर -जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.त्यात पुणे जिल्हात ही रुग्णसंख्या खूप आहे आणि ग्रामीण भागात ही करोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी बुचकेवाडी गावात आरोग्य किटचे वाटप करण्यात आले

अश्या परिस्थितीत गावातील कल्याण येथे प्राध्यापक असलेला एक उच्चशिक्षित तरुण नागेश पवार यांच्या संकल्पनेतून औषध वाटप करण्यात आले. कोरोनाची भयानक परिस्थिती पाहता गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे सायंम शाखा वैष्णवधाम (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) च्या वतीने आरोग्य  किट चे वाटप करण्यात आले.

या मध्ये व्हिटॅमिन सी टॅब्लेटस, मल्टी व्हिटॅमिन सीरप, महासुदर्शन काढा,सितोपलादी चुंर्ण, गुळवेल सत्व,मध आणि इतर उपयुक्त औषधें वाटण्यात आली. नागेश पवार आणि स्वयंसेवक अनिल बंदावणे यांच्या सोबत संपूर्ण  किटचे 46 कुटूंबांना वाटप करण्यात आले.औषधे वाटप करत असताना सोशल डिस्टन्स ची काळजी घेण्यात आली.ह्या अडचणीच्या आणि घबराटीच्या काळात गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संघाच्या वतीने करण्यात आला आहे. वाईट काळात संघाच्या वतीने नेहमी सेवाकार्य होत असते अश्या प्रतिक्रिया वैष्णवधाम च्या गावकऱ्यांकडून मिळाल्या.

Previous articleमाहिलेचा खून करून चोरी करणारा जेरबंद
Next articleपत्नीसह एका वर्षाच्या मुलाची हत्या, पतीची गळफास घेऊन आत्महत्या