पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांचा मुंबई पोलीस आयुक्तांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मान

आवाज जनतेचा न्यूज नेटवर्क

वि.प.मार्ग पोलीस स्टेशन मुंबई येथील पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाच आरोपींबाबत कोणतीही माहिती नसताना तांत्रिक बाबींच्या आधारे बिनचूक विश्लेषण करून परराज्यातून आरोपींना अटक करून जबरी चोरीतील रोख रक्कम हस्तगत करून प्रकरणाचा छडा लावला आहे. मांदळे हे खेड तालुक्यातील मांदळेवाडी (वाफगाव)येथील रहिवासी आहे.

वि.प.मार्ग पोलीस स्टेशन मुंबई येथे पोलीस निरीक्षक असलेले अविनाश मांदळे यांनी या प्रकरणी तपासाधिकारी म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे.

दि.२/४/२०२१रोजी नरेश हरिराम चौधरी, नारायण सिंग राजपूत, जितेंद्र सिंग कालुसिंग गडवी व सहकारी यांनी फिर्यादी महिला एकटीच घरी असल्याचा गैरफायदा घेऊन ७२,८८,,६२० रू ची जबरी चोरी करून पुरावे नष्ट करून पळ काढला.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपी विरोधात काहीच पुरावा प्राप्त होत नसल्याने तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून त्या आधारे पाच आरोपींना गुजरात व राजस्थान येथून अटक केली. जबरी चोरी केलेल्या रकमेपैकी ६४,०३,३४० रू हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास चालू आहे.

दि २/ ४/ २०२१ ते २५/४/ २०२१ या कालावधीत अथक प्रयत्न करून कोणताही पुरावा नसताना आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम पोळ,सिध्देश जोष्टी, दिलीप तांबे, अभिजित देशमुख या तपास पथकाने ही कामगिरी बजावली.

मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रशंसापत्र देऊन सन्मान केला आहे. विविध राजकीय, सामाजिक, संघटनांकडून अविनाश मांदळे व सहकारी यांचे कौतुक केले जात आहे.

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड व कळमोडी पाणलोट विकास संस्था यांचे वतीने अध्यक्ष अशोकराव टाव्हरे, कार्याध्यक्ष दिलीपराव चौधरी यांनी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांचे पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.

Previous articleजुन्नर तालुक्यांतील चार कोविड सेंटरला जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने आधार सुरक्षा साहित्याचे वाटप
Next articleखेड तालुक्यात तरूणांच्या पुढाकाराने  प्लाझ्मादानाची चळवळ