जुन्नर तालुक्यांतील चार कोविड सेंटरला जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने आधार सुरक्षा साहित्याचे वाटप

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुका मित्र मंडळ, पिंपरी चिंचवड, पुणे यांच्या वतीने कै.एस.आर.शिंदे सर यांच्या स्मरणार्थ जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी, लेण्याद्री,ओझर व चाळकवाडी येथील कोविड सेंटरसाठी आवश्यक साहित्य देण्यात आले. यावेळी “चला मारू फेरफटका” व “आपला परिवार” पुणे यांच्यावतीने १०० पी.पी.ई.किट देखील देण्यात आले.

गत आठवड्यात जुन्नर तालुका मित्र मंडळाचे सदस्य योगेश आमले, अण्णा मटाले, नवनाथ नलावडे, दीपक सोनवणे, रोहित खर्गे यांनी जुन्नर तालुक्यातील कोविड सेंटर मध्ये जाऊन तेथे कोणकोणत्या गोष्टींची गरज आणि कमतरता आहे याविषयीची माहिती घेतली होती. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा रक्षक साहित्याची अण्णा मटाले , दिपक सोनवणे यांनी जमवाजमव करून तालुक्याकडे रवाना केले.


यावेळी जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे डाँ. शुभांगी गाडे, डाँ.काळे व इतर कर्मचारी , सोमतवाडी येथे डाँ.अर्चना कर्पे व कर्मचारी , ओझर येथे मेडीकल आँफिसर डाँ.पाडवी,फार्मासिस्ट अबोली कोल्हे, व सर्व कर्मचारी, चाळकवाडी येथे उपसरपंच प्रदीप चाळक,बाळासाहेब अभंग तसेच शिवांजली शैक्षणीक संकुलाचे कोविड सेवा देणारे सेवक उपस्थित हो

यावेळी जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे,कोषाध्यक्ष दिपक सोनवणे, चला मारू फेरफटका व आपला ग्रुपचे सुदाम शिंदे, वनरक्षक, निसर्ग व दुर्गसंवर्धक रमेश खरमाळे, श्रीकांत कदम, किरण कांबळे, सचिन गावडे हे उपस्थित होते.


जुन्ररचे भूमीपूत्र पर्यावरणप्रेमी सुदाम शिंदे यांनी स्वयंस्फूर्तीने या कामी पी.पी.ई. किट ची मदत केल्याबद्दल अध्यक्ष व कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच जुन्नर तालुका मित्र मंडळाने आण्णा मटाले यांच्या सहकार्याने अलायन्झ ग्रुप आँफ पिंपरी चिंचवडचे वतीने तसेच योगेश आमले यांच्या सहकार्याने राजुरी कोविड सेंटरला पंचवीस बेडची मदत केली आहे. पिंपरी पेंढार येथील कोविड सेंटर ला देखील ही मदत करणार आहेत.

याप्रसंगी अण्णा मटाले, योगेश आमले, रोहित खर्गे, ऍड. संतोष काशिद, नवनाथ नलावडे, विजय ढगे,उल्हास पानसरे, व्याख्याते भाऊसाहेब कोकोटे तसेच सर्व कार्यकारिणी व सभासद
यांचेही मंडळाचे वतीने दिपक सोनवणे यांनी आभार मानले.

तसेच लेण्याद्री ग्रामस्थ व कोविड सेंटरच्या वतीने दिलेल्या मदतीबद्दल लेण्याद्री गावच्या पोलिस पाटील कविता बिडवई, गिरीजात्मक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बिडवई, लेण्याद्री देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे यांनी तर चाळकवाडी कोविड सेंटरचे वतीने शिवांजली शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष शिवाजी चाळक व उपसरपंच प्रदीप चाळक यांनी जुन्नर तालुका मित्र मंडळाचे आभार मानले.

Previous articleप्रशासन,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आणि हॉटस्पॉट असलेल्या गावातील सरपंच यांच्यात ऑनलाईन मिटिंग संपन्न
Next articleपोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांचा मुंबई पोलीस आयुक्तांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मान