खेड तालुक्यात तरूणांच्या पुढाकाराने  प्लाझ्मादानाची चळवळ

राजगुरूनगर : कोरोना या जागतिक माहामारीची दुसरी लाट अतिशय भयानक आहे. पहिल्या लाटेच्या वेळी राज्यांच्या अंतर्गत स्थानांतरणे  झाली. त्यावेळी अनेक सामाजिक संस्था अन्नदान करण्यासाठी मदतीसाठी  उभ्या राहिलेल्या अवघ्या महाराष्ट्राने पाहिल्या त्यावेळी अशा संस्थांचे सर्व सामाजिक स्तरातून अभिनंदन देखिल झाले. परंतु दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या अगदी वेगळी  आहे. यावेळी कोणाचा संसर्ग झालेला रुग्ण अगदी कमी वेळात हॉस्पिटलमध्ये  मृत होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे  डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडिसीवर इंजेक्शन व प्लाझ्मा देण्याचा सल्ला द्यावा लागत आहे.या लाटेच्या सुरुवातीला प्लाझ्मा मिळणे अतिशय जिकरीचे झाले होते.

 अशातच खेड तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर अंकुश ठेवणे प्रशासनाला देखील अशक्य झाले होते.त्यातच डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन मध्ये प्लाझ्मा लिहून दिल्यानंतर त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडायची रुग्णाचे नातेवाईक अक्षरशः सोशल मीडिया मध्ये याबाबतचे मागणीचे मेसेज फिरून प्लाझ्मा मिळण्याची याचना करायचे. तरीदेखील असा कोविड झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा शोधून देखील सापडत नसे. प्लाझ्मा, रेमडीसीवर, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने अनेक रुग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती डोळ्यासमोर बघत असताना खेड तालुक्यातील सामाजिक काम करणारे समविचारी तरुण एकत्र आले आणि त्यांनी प्लाझ्मा दानाची चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला

१७ एप्रिल रोजी ॲड. निलेश आंधळे, सदाशिव आमराळे, अमर टाटीया, कैलास दुधाळे, बाबासाहेब दिघे व महेंद्र शिंदे यांनी  व्हाट्सअप ग्रुप सुरू केला. या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना प्लाझ्मा दानाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा देण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली. कैलास दुधाळे यांनी राजगुरूनगर शहरात रिक्षा फिरवून ऑडीओ क्लिपद्वारे जनजागृती केली. तसेच फेसबुक व व्हाट्सअपवरही प्लाझ्मा देण्याबद्दल जागृती करण्यात आली.यातूनच ही प्लाझ्मा दानाची चळवळ उभी राहिली.

प्लाझ्मा देणारे डोनर शोधणे, त्यांना रुग्णाच्या नातेवाईकांशी जोडून देऊन भोसरी, पिंपरी चिंचवड येथील रक्तपेढ्यांमध्ये पाठवून प्लाझ्मा दान करून घेऊन प्रत्येक रुग्णाला प्लाझ्मा मिळवून देणे असे काम केले जाते.  आजपर्यंत या टीमने 200 पेक्षा अधिक रुग्णाना मदत मिळवून दिली आहे. यातून अनेक रुग्नांना जीवदान मिळाले आहे.याबरोबरच ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड यांची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना देणे. रेमडीसीवर इंजेक्शन शासकीय पद्धतीने कसे मिळवता येईल याची माहिती पुरवणे असे काम ही टिम नित्यनियमाने करत आहे. दिवसाला या टीमला २५ पेक्षा अधिक फोन येतात त्यावर काम करून त्यांचा प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचे काम ही टिम करत आहे. एकीकडे सर्व राजकीय पुढारी हतबल होऊन घरात बसलेले असताना ही टीम मात्र प्रत्यक्षात फिल्ड वर उतरून काम करत आहे.

प्रतिक जाधव, यज्ञेश सुंबरे, प्रशांत टोपे, श्रेयस प्रभू व तालुक्यातील मोठ्या गावातील सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याबरोबरच नव्याने कोरोनाबाधीत होऊन बरे झालेल्या व्यक्तींची नावेनोंदणीही करून पुढील महिन्यात डोनरची कमी भासणार नाही याचे नियोजन देखील सुरू आहे. तसेच सोमवारपासुन प्लाझ्मा दात्यास भोसरी व पिंपरी-चिंचवड येथील ब्लड बँकेत ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनाची देखील सुविधा पुरवण्यात येत आहे

Previous articleपोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांचा मुंबई पोलीस आयुक्तांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मान
Next articleराजगुरूनगर मध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध