प्रशासन,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आणि हॉटस्पॉट असलेल्या गावातील सरपंच यांच्यात ऑनलाईन मिटिंग संपन्न

चाकण : खेड तालुक्यातील covid 19 उपाय योजना संदर्भात ऑनलाइन मीटिंग प्रशासन, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आणि हॉटस्पॉट असलेल्या गावातील सरपंच मिटिंग घेण्यात आली यामध्ये बहुतांश जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित झाले होते यावेळी खेड तालुक्यातील अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली

यामध्ये माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गा बाबत पुढील मुद्दे उपस्थित केले

१ )  तालुक्यातील संसर्ग थांबविणे महत्वाचे आहे.या आठवड्यात संसर्ग झालेले रुग्ण कारखान्यातील कामगार किंवा त्यांचे कुटुंबीय आहे.त्यामुळे आजचा धोका कारखान्यांमुळे आहे.इथे कामगारांची तपासणी होत नाही.आमचे सरपंच आज त्यांना सांगायला गेले तर ९० टक्के कारखाने तपासणी करत नाही हे लक्षात आले. Rt-pcr तपासणी करणारे आणि न करणारे यांची यादी प्रसिध्द करावी अशी आग्रही मागणी केली.

२ ) प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांना covid उपाय योजना गोळ्या आणि साधन सामुग्री लगेच उपलब्ध करू द्या.

३ ) स्वाब दिल्यानंतर रिपोर्ट ४-५ दिवस येत नाही.त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांना positive रुग्ण कळतं नाही.तो रुग्ण अनेकांना तोपर्यंत संसर्ग करतो आहे.त्यामुळे ही दिरंगाई थांबवायला हवी.

४ )  positive रुग्ण आणि मृत्यूचे आकडे चुकीचे आहेत.वस्तुस्थिती यादी व्ह्

५ ) महात्मा फुले जन आरोग्य योजना मध्ये गरीब रुग्णांना उपचार मिळायला पाहिजे.पण आज तसे होताना दिसत नाही.सर्व रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्याशिवाय उपचार केले जात नाही.

६ ) खेड तालुक्यातील ऑक्सिजन बेड तातडीने वाढविले पाहिजे.गरीब लोकांचे प्रचंड हाल आहेत.अगदी लोक आता सोनंनाणं विकून उपचार घेत आहेत.खाजगी हॉस्पिटल मध्ये रुग्णांची मोठी लूट होत आहे.
आशा आशयाचे मुद्दे प्रशासना समोर मांडण्यात आले या ऑनलाइन मिटिंग साठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे,खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, गटविकास अधिकारी  अजय जोशी ,तालुका वैद्यकीय अधिकारी बळिराम गाढवे ,जि. प.सदस्य ,शरद बुट्टे पाटील, जि.प.सदस्य बाबाजी काळे ,पंचायत समिती माजी सभापती अंकुश राक्षे आदी होते

Previous articleवाघोलीच्या सोसायटीमधील लसीकणावरुन राष्ट्रवादीचे खासदार आणि शिवसेना पुणे जिल्हा प्रमुखांच्या कार्येकर्तांत शीत युध्द
Next articleजुन्नर तालुक्यांतील चार कोविड सेंटरला जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने आधार सुरक्षा साहित्याचे वाटप