वाघोलीच्या सोसायटीमधील लसीकणावरुन राष्ट्रवादीचे खासदार आणि शिवसेना पुणे जिल्हा प्रमुखांच्या कार्येकर्तांत शीत युध्द

वाघोली-सुरेश वांढेकर

लसीकरणाबाबत काढण्यात आलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे उल्लंघन करत स्थानिक प्रतिनिधींनीमुळे वाघोली कोविड केंद्राबाहेर सोसायटीमध्ये सुरु असलेल्या लसीकरणावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला असून याबाबत पुणे जिल्हा परिषद चौकशी करण्यासाठी आदेश दिला आहे.कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसींच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांना कित्येक तास रांगेत उभे राहून रिकाम्या हातानेच माघारी फिरावे लागत आहे. याच दरम्यान राजकीय स्थानिक प्रतिनिधींमुळे लसीकरणाबाबत काढण्यात आलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे उल्लंघन करत वाघोली कोविड केंद्राबाहेर पूर्वरंग सोसायटी व क्लब हाऊसमध्ये लसीकरण सुरू असल्याची बाब खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनास आणून दिली.याबाबत आयुष प्रसाद यांनी लसीकरणाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

यानंतर आता दोन्ही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्यांची बाजू सावरत विरोधी पक्षावर टीका करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे वाघोली मध्ये आता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे शीतयुद्ध पाहायला मिळत आहे याबाबत काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.

तुम्हाला लोकांच्या जीवाची खेळांयांचा अधिकार नाही ज्या समाजानी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आणि तुम्हीच लसीकरण करण्यासाठी अडकाठी करत असाल तर ज्या लोकांनी डोक्यावर घेतले आहे हेच लोक तुम्हाला डोक्यावर उभे करतील,खासदारा म्हणून तुम्ही वाघोलीकरांसाठी आता पर्यन्त व्हेंटिलेटर,डॉक्टर किंव्हा काय उपलब्ध करून दिले हे दाखवून द्यावे.लोक जीवन मरणाच्या दारात आहेत आम्ही लोकांसाठी स्वखर्चाने काम करणार आहोत आम्ही आमचं पद गेलं तरी चालेल बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही त्यांनाही काम करायचं तर त्यांनीही रस्त्यावर उतरावे घरात बसून आदेश देऊ नये.

ज्ञानेश्वर कटके जिल्हा परिषद सदस्य,पुणे

खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः काही न करता घरी बसता बाकीचे काम करत असताना मध्ये अडथळा आणू नये – मच्छिंद्र सातव, युवा सेना

महाविकास आघाडी मध्ये लसी वरून श्रेयवादाच राजकारण चालु आहे लस ही नियमानुसार दिली गेली पाहीजे यांनी लोकांच्या जिवाशी खेळु नहे सत्तेचा दुरुपयोग व राजकारण करू नये .

दादासाहेब सातव, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य, पुणे

सर्वांनी राजकारण न करता सर्व नागरिकासाठी लसीकरण उपलब्ध करून द्यावेत अन्यथा रासपाच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारले जाईल .सागर गोरे, रासपा,

पहिला प्रश्न की लसीकरण वैयक्तिक आहे की शासनामार्फत आहे. जर ही शासकीय असेल तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला बोर्ड किंव्हा वैयक्तिक एजेंट ठेवण्याचा अधिकार आहे का? शासनाच्या आदेशाचे पालन न करता आपल्या जवळील सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण करणे कायद्याला धरून नाही. त्यामुळे संबंधित आरोग्य विभाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.आमचा सोसायटीच्या लसीकरणाला विरोध नाही परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे लसीकरण होणे गरजेचे आहे.

राजेंद्र सातव पाटील,माजी उपसरपंच, वाघोली

खासदाराला संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अशा खासदारावर आपली पात्रता पाहून टीका करावी. तसेच मतदानाच्या वेळेस मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे एका पक्षाच्या स्लिपा वाटल्या जातात त्याप्रमाणे लसीकरण केंद्रावर एका पक्षाची मक्तेदारी असल्याप्रमाणे काम चालू आहे.वाडी, वस्ती, सोसायटी हे सर्व एक आहेत त्यांच्यात जाणीवपूर्वक राजकारण करुन मतभेद करु नयेत.

बाळासाहेब सातव,वरिष्ठ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, हवेली

लसीकरण करण्यावर कोण्ही राजकारण करू नये वाघोलीतील सर्वानासाठी लस देण्यासाठी एकत्र येऊन पर्यन्त करावेत.
वसुंधरा शिवदास उबाळे, सरपंच,वाघोली

आपल्याला लसीकरण करायचे होते तर कष्टकरी ,कामगारांच्या झोपडपट्टी पासून सुरवात करायला हवी होती,कारण ते लसीकरण बाबत अज्ञानी आहेत,माञ आपण उलटे केले सुरवात उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकांपासून केली हे कितपत योग्य आहे.
बस्तू रेगे (संतुलन)

कुठले ही राजकारण होल्डींग बाजी न करता सर्वसामान्यांना लसीकरण करावे.
शांताराम कटके, माजी उपसरपंच

गरिबाला वाली नाही कारण की प्रत्येक प्रशासकीय सुविधा तोंड पाहून दिली जाते लसीकरण बाबतीत व कोविड सेंटर बाबतीत गरिबांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
कमला वाघोलीकर

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या श्रेय वादामुळे कारण आणि राजकारणामुळे सर्व साधारण नागरिकांचे निष्कारण हाल होत. लस ही केंद्र व राज्य कडून मोफ़त येत आहे. स्वतःच नावावर यांची पोळी स्थानिक नेते भाजत आहेत.

नरेंद्र वाघमारे,वाघोली

Previous articleकासुर्डी येथे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रक्तदान शिबिर संपन्न
Next articleप्रशासन,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आणि हॉटस्पॉट असलेल्या गावातील सरपंच यांच्यात ऑनलाईन मिटिंग संपन्न