मंचर उपजिल्हा रुग्णालयाला पोर्टेबल साउंड सिस्टीम भेट

प्रमोद दांगट, निरगुडसर

आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे मा अध्यक्ष संतोष वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर व्यापारी महासंघाच्या वतीने मंचर उपजिल्हा रुग्णालयाला पोर्टेबल साउंड सिस्टिम भेट देण्यात आली.

पत्रकार संतोष वळसे पाटील व मंचर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय घुले यांनी ही साउंड सिस्टीम मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आंबादास देवमाणे व डॉ.गणेश पवार यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी मंचर व्यापारी महासंघाचे प्रणव थोरात, सागर काजळे, प्रशांत थोरात, भावेश पुंगलिया, गणपत क्षीरसागर, पत्रकार सचिन तोडकर, प्रशांत बागल, डॉ.रियाज इनामदार, शरद पोखरकर, भावना सोमवंशी, स्वप्नील औटी, विकास कडवे, भिमाजी इंदोरे, मोहन पटेल, सचिन लोंढे, ज्ञानेश्वर शेटे सर उपस्थित होते.

कोरोनाचा भयानक परिस्थिती मध्ये सर्वत्रच कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये नकारात्मक वातावरण झालेलं पाहायला मिळत आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयातही मागील एक वर्षापासून समर्पित कोविड उपचार केंद्र सुरू आहे. कोरोना रुग्णांची रोजची वर्दळ व रुग्णांच्या नातेवाईकांची होणाऱ्या हृदयद्रावक परिस्थिती मुळे मंचर उपजिल्हा रुग्णालय परिसरातील वातावरण कंटाळवाणं झालेलं आहे. या वातावरणात सकारात्मकता येण्यासाठी मंचर व्यापारी माहासंघाने दिलेल्या पोर्टेबल साउंड सिस्टीम ची मदत होणार असून या साउंड सिस्टीम वर दिवसभर मंजुळ संगीत व सकारात्मक गाण्यांबरोबर भक्तिगीते वाजविण्याजे आम्ही नियोजन करणार आहे. असे मत यावेळी मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आंबदास देवमाणे यांनी व्यक्त केले.

Previous articleनियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई
Next articleमांडूळाची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक