नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी उरूळी कांचन परिसरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने पोलीसांनी १६५ जणांवर केलेल्या दंडात्मक धडक कारवाईत गेले १० दिवसांत ८२ हजार ५०० रूपये वसुल केले आहेत.

पुणे शहर व राज्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवुन कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बध करून अत्यावश्यक सेवा व त्यासंबंधी आस्थापना या सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुरू ठेवण्याबाबत आदेश पारित केलेला आहे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोना प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणारे नागरीकांचे विरोधात ठोस कारवाई करण्यात आली आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली व नियोजनाप्रमाणे स्थानिक प्रशासनाचे मदतीने उरूळी कांचन पोलीसांनी विहीत वेळेत दुकाने बंद न करून पारित केले नियमांचे उल्लंघन करणारे नागरीकांवर तसेच विनाकारण, विनामास्क फिरणारे नागरीकांवर १२ एप्रिल ते २३ एप्रिल रोजीच्या दरम्यान एकुण १६५ दंडात्मक कारवाई करून ८२ हजार ५०० रूपये दंड वसुल केला आहे. १२ ऑगस्ट रोजी उरूळी कांचन परिसरामध्ये कोराना सक्रिय रूग्णसंख्या ११९ अशी होती. ती संख्या २२ ऑगस्ट रोजी ८७ अशी झालेली असुन कोरोना रूग्णसंख्या वाढीवर नियंत्रण
मिळविण्याचे कार्य नमुद केलेल्या कार्यवाहीमुळे सफल झाले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ पुणे नम्रता पाटील सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली उरूळी कांचन पोलीस दुरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, महीला पोलीस हवालदार भारती होले, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, संदीप पवार, सचिन पवार, पोलीस सोमनाथ चित्तारे, युवराज धोंडे तसेच उरूळी कांचन बिट मार्शल पाटोळे व चव्हाण यांनी केली आहे

Previous articleहनी ट्रॅपचा झाला भांडाफोड ! आमदार दिलीप मोहिते पाटील या़ंना बदनाम करण्यासाठी रचलेला कट उधळला
Next articleमंचर उपजिल्हा रुग्णालयाला पोर्टेबल साउंड सिस्टीम भेट