मांडूळाची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक

प्रमोद दांगट,निरगुडसर

मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोघांना मंचर पोलिसांनी भराडी फाटा (ता .आंबेगाव ) येथून अटक केली असून त्याच्या कडून पोलिसांनी दुचाकी व दोन मांडूळ जातीचे सर्प जप्त केले आहेत.

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भराडी गावच्या हद्दीमध्ये भराडी फाटा येथे बस स्टॉप येथे संभाजी बाबुराव राजगुरू रा.भराडी ता.आंबेगाव पुणे व सुनील दिलीप पवार ( रा.निरगुडसर ,ता.आंबेगाव ) हे दोघेजण दोन मांडूळ जातीचे सर्प घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना कळाली असता त्यांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोटर सायकल एम.एच.14 बी.5304 ही दुचाकी व दोन मांडूळ जातीचे सर्प ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleमंचर उपजिल्हा रुग्णालयाला पोर्टेबल साउंड सिस्टीम भेट
Next articleवृद्ध आई-वडिलांना घरातून काढले बाहेर ; मुलासह सुनेवर गुन्हा दाखल