खासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यां सोबत ऑनलाइन बैठक

अमोल भोसले पुणे

विचारांची प्रगल्भता म्हणजे नक्की काय हे आजच्या ताईंच्या बोलण्यामधून समजले, आज महाराष्ट्रातील विरोधाक संकट काळात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असताना , ताईंनी आम्हां सर्वांना लाख मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे हि वेळ राजकारण करण्याची नाही. तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला सढळ हस्ते हवी ती मदत करण्याची आहे. कोविड सारख गंभीर संकट आज महाराष्ट्रात थैमान घालतय या परिस्थितीला घाबरून न जाता लोकांना धीर देण्याची व परिस्थितीतुन सावरण्यासाठी मदत करण्याची आहे. कोव्हिडं संकटात कलेक्टर,आयुक्त सर्व शासकीय यंत्रणा २४ तास कार्यरत आहेत सोबतीला खासदार सुप्रिया सुळे देखील रात्री-अपरात्री गरजु रुगणांना मदत करत आहेत. या संकट काळात कोणीही राजकारण न करता मदत करा हा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

एक वेळ अस वाटलं ताई म्हणतील असं राजकारण करा तसं राजकारण करण्यासाठी सल्ला देतील पण असं न घडता ज्या महाराष्ट्राच्या भूमीत व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या संस्कारात वाढलेल्या ताई सर्वांना सांगत होत्या आज वेळ खूप वाईट आहे आणि आपण आपल्या जनतेला मदत ही करायला हवी , राजकारण नंतर करू पण अगोदर मानवता पहिली , आज ताईंचे शब्द एकूण डोळ्यात पाणी आले कारणं सुसंस्कृत पणा म्हणजे नेमकं काय ते उमगत होत, आम्ही सोशल मीडियावर कार्य करतो त्याचे कौतुक देखील झालं पण आजची मिटिंग खूप काही शिकवून गेली.

विरोधकांनी संकटकाळात राजकारण न करता जनेतला मदत करावी , संकट आपण सर्वजण मिळून उलथावून लावू मग खुशाल राजकारण खेळत बसू आजच्या ऑनलाइनच्या मिटिंग मधून लाख मोलाचे मार्गदर्शन लाभले. सागर जाधव, अजय हिंगे, सुदर्शन जगदाळे, सतीश पवार, सुहास उभे, अमोल कावळे, तुषार लोखंडे, आयुब जामदार, शेफाली जैन , प्रमोद गायकवाड, सागर आहेर, सौरभ भिलारे, मिलिंद गोरे, जितेंद्र गायकवाड, रुपेश खेडेकर, गणेश शिंदे ,आशिष मेटे, विलास मगर आदींनी ऑनलाइन मिटिंगमध्ये सहभाग नोंदवला.

Previous articleपूर्व हवेलीच्या प्रत्येक गावांमध्ये क्वारनटाईन सेंटर उभे करण्यासाठी परवानगी देण्याची पै संदीप आप्पा भोंडवे यांची आरोग्य विभागाकडे मागणी
Next articleकोरोना- संचारबंदी नंतरच्या पर्यटनास MTDC सज्ज-प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे