पूर्व हवेलीच्या प्रत्येक गावांमध्ये क्वारनटाईन सेंटर उभे करण्यासाठी परवानगी देण्याची पै संदीप आप्पा भोंडवे यांची आरोग्य विभागाकडे मागणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोनाचा वाढणारा प्रचंड मोठा प्रभाव पाहता प्रत्येक गावागावात सुद्धा कोरोनाचे पेशंटची प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. तालुकास्तरावर विविध ठिकाणी असणाऱ्या क्वारन टाईन सेंटरमध्ये पण भरलेली असून त्यावर आता अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातून सर्वसामान्य लोकांची फार मोठी परवड होत आहे.जे लोक कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत त्या लोकांना कोरन टाईन सेंटरमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत.

हॉस्पिटल मध्ये सुद्धा बेड उपलब्ध नाहीत ऑक्सिजनचा आणि व्हेंटिलेटर बेडचा प्रचंड मोठा तुटवडा जाणवत आहे. तसेच रेडमीसीवनचे इंजेक्‍शनचा ही प्रचंड मोठा तुटवडा भासत आहे, यावर सुद्धा जिल्हा आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.अशा या महाभयंकर परिस्थितीमध्ये गावा गावातील रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी आज आरोग्य विभागाकडे प्रत्येक गावामध्ये कोरंटाईन सेंटर सुरू करण्याविषयी मागणी केली. व आरोग्य विभागातर्फे काही सुविधा मिळाव्यात काही सुविधा ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुरवण्यात येतील असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं. जर परमिशन मिळाल्यास प्रत्येक गावामध्ये २० ते ३० बेड सेंटर ग्रामस्थांसाठी तयार करण्यात येईल .याची व्यवस्था गावात असल्यामुळे व घरचा डब्बा जाण्यास मदत होईल त्याच्या मुळे यांना कोरोणा झालेला आहे.. असे लोक सुद्धा न घाबरता पुढे येऊन कोरन टाईन सेंटरमध्ये भरती होऊ शकतील, वेळेत उपचार झाल्यानंतर कुठल्याही पेशंटला जीवाशी जावे लागणार नाही व वेळेत भरती झाल्यास त्या व्यक्तीपासून जीवाणू बाहेर पसरणार नाही व इतरांना त्याची लागण होणार नाही. कोरोना हा पहिल्या स्टेजवर असताना योग्य उपचार केल्यास तो बरा होतो हा अनुभव आपल्याला असल्यामुळे तो फायदेशीर ठरेल.

या कामासाठी गावातील आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल, व गावातील तरुण मंडळी यांची मदत होऊ शकते. आणि भविष्यामध्ये फार मोठ्या संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे त्याला काही प्रमाणात आपण तो रोखु शकतो या अनुषंगाने आरोग्य विभागाचे पाठपुरावा सुरू आहे असे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले

Previous articleबनावट रेमडिसिव्हर बनवणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार दिलीप गायकवाडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next articleखासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यां सोबत ऑनलाइन बैठक