कोरोना- संचारबंदी नंतरच्या पर्यटनास MTDC सज्ज-प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे

पुणे-संपूर्ण जगात आज रोजी कोरोनाव्हायरस या महामारी चे मोठे संकट आलेले आहे. उभ्या जगाशी गनिमी कावा खेळणाऱ्या हा दुष्ट विषाणु मुळे आपला भारत देश पण प्रभावित झालेला आहे. या संकटाचा सामना करत असताना आपल्या सरकारने घेतलेला संचारबंदीचा निर्णय हा कोरोनाव्हायरस च्या वेगाने वाढणाऱ्या प्रसाराला थांबवण्यासाठी अतिशय गरजेचा आहे. आताची साधारणतः परिस्थिती, इतर देशांची उदाहरणे व आपल्या सरकारचे प्रयत्न बघता ही परिस्थिति मे – 2021 पर्यन्त सुधारणे अपेक्षित आहे. त्यानंतरही सरकारकडे पर्यटन या क्षेत्राशिवाय अन्न , आरोग्य, रोजगार, ई . प्राधान्याचे विषय असणार आहे. या संकटामुळे पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या महामारी नंतरच्या काळात पर्यटकांसाठी दीर्घकालीन उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

सध्याच्या वातावरणामुळे सर्वाधिक परिणाम हा पर्यटन उद्योगावर झाला आहे. संचारबंदी मुळे सर्वच बाबतीत मर्यादा आल्या आहेत. तथापि, या काळामध्येही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कर्मचारी सतत काम करीत आहेत. स्वच्छता हीच सेवा आणि अतिथी देवो भव ही ब्रीद वाक्य उराशी बाळगुन संचारबंदी असली तरिही पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे योग्य ती खबरदारी घेवुन सुरु करण्यात आली आहेत. पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना केल्याने आणि पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात यशस्वी झाली असल्याने डिसेंबर आणि जानेवारी साठी सर्व पर्यटक निवासे 100 टक्के फुल झाली होती.


वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी जावुन रहावे आणि सोबत कामही करावे असे वाटणे साहजिक आहे.

आगामी काळात पर्यटकांना वेगवेगळया प्रकारे आकर्षित करुन पर्यटन व्यवसायास भरभराटी येणार आहे. मात्र सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी कायमस्वरुपी करण्यात येत असुन पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदी‍क काढा, व्हिटयॅमिन सी आणि डी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मुखपटटी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. सर्वच पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण सुरु झाले असुन आजअखेर एकही कोरोना बाधीत महामंडळाच्या पर्यटक निवासात निदर्शनास आलेला नाही.

 उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.
दरम्यान, संचारबंदीच्या काळात पर्यटक संख्या कमी होण्याची शक्यता गृहीत धरुन महामंडळ विशेष योजना राबवित आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना बाबतची खबरदारी, प्रथमोपचार याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच हॉटेल व्यवस्थापनातील तज्ञांकडुन प्रशिक्षण आयोजित करुन कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी तयार करण्यात येणार आहे.

वर्क फ्रॉम नेचर’, “प्री-वेडींग फोटो शुट”, “डेस्टिनेशन वेडींग”

मोफत वायफाय झोन ; निसर्गाच्या सानिध्यात ऑनलाईन काम करण्यास प्राधान्य देणार…

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे पुनश्च: संचारबंदी लागली आहे. पण या सचारबंदीनंतर निसर्गरम्य असलेल्या महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये सध्या कोरोना बाबतची सर्व खबरदारी घेवुन पर्यटनाचा आनंदघेता येणार आहे. एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवासे ही मनोहारी समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणी डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरुपी यादगार करण्यासाठी एम. टी. डी. सी. च्या निसर्गरम्य पर्यटक निवास आणि परिसरात संचारबंदी नंतर आणि कोरोना कमी झाल्यानंतर यावे यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात असुन सर्व प्रकारच्या उपाययोजनांसह सज्ज्‍ होत आहे. महामंडळाने अशा हौशी पर्यटकांसाठी सवलती जाहीर करणार आहे. त्यामुळे आगामी कोरोना आणि संचारबंदी नतंरच्या काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याने पर्यटक यांचा लाभ घेता येणार आहे. सदरच्या योजनांचा लाभ पर्यटकांनी डिसेंबर आणि जानेवारी महीन्यात मोठया प्रमाणावर घेतला होता.

“वर्क फ्रॉम नेचर” आणि “वर्क विथ नेचर”

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आयटी आणि इतरही कंपन्यांकडुन नव्याने “वर्क फ्रॉम होम” जाहीर करण्यात आले आहे. कार्यालयातील कर्मचारी वर्गालाही एकाच वातावरणात सतत काम करून मानसिक थकवा येतो. त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होतो. नोकरदारवर्गाची जशी अडचण होते तशीच अडचण विविध प्रकल्पांवर काम करणारे अधि‍कारी, गुंतवणूकदार किंवा व्यापारी, उदयोजकांचीही होते. अशा सर्वच घटकांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत कामही करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टवर वायफाय झोन ची सुविधा दिली आहे. त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खाश्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी ) पर्यटनस्थ्‍ळावरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय झोन सुविधा दिली आहे. त्यानुसार ‘वर्क फ्रॉम होम’ च्या धर्तीवर “वर्क फ्रॉम नेचर” आणि “वर्क विथ नेचर” अशी संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थ्‍ळावरून काम करीत पर्यटनाचा आनंद व्दिगुणि‍त करण्यास महामंडळ उत्सुक आहे. चार-पाच दिवसांची सुटी घेत रिसॉर्टवर जाउन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे कोरोना संचारबंदी नंतरच्या काळात शक्य होणार आहे. या सुविधेमुळे कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. याशि‍वाय रोज त्याच त्या ठिकाणी बसून काम करण्याचा आलेला कंटाळा घालवून निसर्गाच्या सानिध्यात राहून चांगले काम करता येणे शक्य होणार आहे. संचारबंदी आणि कोरोना नंतर टप्प्याटप्प्याने राज्याभरातील ‘एमटीडीसी’ च्या सर्व रिसॉर्टवर अशी सुविधा होणार आहे.

वेलनेस टुरिझम आणि मन: शांती केंद्र.

सध्याच्या वातावरणाचा वेलनेस – मेडिकल टुरिझम या विषयांचा भर देण्यात येणार आहे. कोरोना संसर्गातुन पुर्णत: बरे झाले आहेत अशा लोकांसाठी यापुढे कोरोना संसर्ग होवु नये यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे अन्नपदार्थ असणारे रुचकर जेवण आणि योगोपचार याबाबत मार्गदर्शन शिबिर पर्यटक निवासात येणाऱ्या पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गातुन सावरलेल्या पर्यटकांना आयुर्वेदिक उपचार पध्दती आणि योगोपचार याबाबत माहीती देणे, योगा सत्र सुरु करणे, त्रासलेल्या आणि मनस्वास्थ्य भरकटलेल्या मनाला शांती देण्यासाठी मेडीटेशन सेंटर सुरु करणे, या सुविधा देण्यावर भर देता येणार आहे. पर्यटकांसाठी निसर्गाच्या सानिध्यात “वर्क फ्रॉम नेचर” बरोबरच योगा, मेडीटेशन सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखादया पर्यटकाला त्याने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. “वर्क फ्रॉम नेचर” बरोबरच योगा आणि मेडीटेशन अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे सुरु करण्यात येणार आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा होईल. पर्यटकांना कोरोना संचारबंदीनंतर महामंडळाच्या पर्यटक निवासात पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोना बाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसुन येईल. निसर्गाचे भान ठेवुन आणि कोरोना बाबत दक्षता घेवुन आगामी संचारबंदीनंतरच्या काळात बिनधास्त पर्यटन करता येणार आहे.

श्री. दिपक हरणे-प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

Previous articleखासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यां सोबत ऑनलाइन बैठक
Next articleघरच्या घरी रोगप्रतिकारशक्ती तपासा व उपाययोजना घरी करा