कोरेगाव बु वि.का. सोसायटीच्या चेअरमनपदी माजी सरपंच रखमाजी गोगावले यांची बिनविरोध निवड

सोमनाथ टोपे, चाकण :कोरेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी रखमाजी गोगावले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सोसायटी निवडणूक बिनविरोध पार पडली.

यावेळी बाजार समितीचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी मुलानी साहेब यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव बाबाजी वाळुंज व व्हाईस चेयरमन कमलाबाई लवंगे , संदिप डावरे , माणिक डावरे, विनायक लवंगे ,सुरेश डावरे , संतोष डावरे ,अनंदा लगाडे , बाबुराव सुतार यांचे सहकार्य मिळाले. निवडीनंतर रखमाजी गोगावले यांचा आमदार दिलीप मोहिते व सभापती विनायक घुमटकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleविवाहित महिलेला पैशाची मागणी व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती,सासु- सासरा, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल
Next articleप्रिया पवार यांची युवती काँग्रेसच्या मुख्य समन्वयक पदी निवड