विवाहित महिलेला पैशाची मागणी व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती,सासु- सासरा, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल

भोसरी – नेहा रितेश (शिरसाठ,रा.खिरीड वस्ती,मोशी) या विवाहितेचा गेली तीन वर्षे पती रितेश शिरसाठ, सासु-कल्पना शिरसाठ , सासरा-पोपटराव शिरसाठ, नणंद -पुनम कुंवर हे अनन्वित छळ करीत होते.लग्नात रोख हुंडा देऊन घर बांधकामासाठी वडिलांनी तीन लाख रुपये दिले नाही म्हणून नेहा शिरसाठ हिला वडिलांनी लग्नात दिलेले दहा तोळे सोने काढून घेतले होते.

पती रितेश शिरसाठ व सासु, सासरे,नणंद सतत मारहाण व शिवीगाळ करीत.नेहा शिरसाठ या एम.ए (इंग्रजी )उच्चशिक्षित असून त्यांचे वडील रविंद्र मगरे हे शासकीय सेवेत असून नाशिक येथे वास्तव्यास आहेत.
नेहा शिरसाठ यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला असून पती चाकण येथील गॅब्रीएल इंडिया कंपनीत सप्लाय मॅनेजर आहे.

दोन वर्षे नेहा या सासु सासरे यांच्याबरोबर धुळे येथे राहत होत्या.तेथे त्यांचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने नाशिक येथील महिला सहाय्य संस्थेकडे तक्रार केल्यानंतर पती रितेश शिरसाठ एक वर्षापूर्वी नेहा यांना मोशी येथे आणले.गेली एक वर्षभर पती रितेश शिरसाठ हा बाहेर खाणेपिणे करीत असून नेहा यांना पाणी ,गॅस न देणे मारहाण करणे असा सातत्याने त्रास देत होता.नोकरी व आई वडिलांच्या मदतीने नेहा हालअपेष्टा सहन करून राहत होती.मोशी व जवळपास कोणी नातेवाईक नसल्याने अत्याचार सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता.

मोशी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव गोरडे व त्यांची पत्नी मनिषा गोरडे यांना नेहा यांनी कैफियत मांडली असता त्यांनी तातडीने शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड या संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्याकडे नेले.टाव्हरे यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस ,आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन दिले. त्याचे सचिव राहुल देशपांडे यांनी पोलीस उपायुक्तांना फोन केले.अशोकराव टाव्हरे यांनी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांची भेट घेतली.
एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनने नेहा शिरसाठ व त्यांचे वडिल रविंद्र मगरे यांना बोलावून जबाब घेतले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या आदेशानुसार नेहा शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून पती,सासू, सासरे व नणंद यांच्या विरोधात 498-A,323,504,34 कलमाअन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Previous articleअजितदादा पवार यांच्या घोषणेनंतर दोन तासात ‘सारथी’ला मिळाले ८ कोटी रुपये
Next articleकोरेगाव बु वि.का. सोसायटीच्या चेअरमनपदी माजी सरपंच रखमाजी गोगावले यांची बिनविरोध निवड