प्रिया पवार यांची युवती काँग्रेसच्या मुख्य समन्वयक पदी निवड

Ad 1

राजगुरुनगर-खेड तालुक्यांतील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रिया नारायणराव पवार यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी पदोन्नती झाली आहे तसेच त्यांना राज्याच्या युवती काँग्रेसच्या मुख्य समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहिर केले आहे.

प्रिया पवार या माजी आमदार स्व.नारायणराव पवार यांच्या कन्या असून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय कार्य करत आहेत. कोरोनाच्या महामारीत त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याची पावती त्यांना मिळाल्याची चर्चा आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.