आनिता व विशाल या धाडसी दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद- ऊमाकांत पारधी

अमोल भोसले- पारधी म्हणले की चोर अशा कंलकीत नजरेन ज्यां समाजाकडे नेहमी संशयाने पाहीले जात होते.मात्र आज त्यांच्या मदतीमुळे खरे आरोपी गजा आड करण्यास परभणी पोलीसाना यश आले, गेली अनेक दिवसा भोंदु माउली महाराज नावचा व्येक्ती पोलीसांना चकवा देत फिरणाऱ्या भोदुला पकडुन पोलीसाच्या ताब्यात देण्या-या नामदेव भोसले यांच्या टिमला यश आले. त्यांचे कौतुक करावे तेवडे कमी आहे असे सेलूचे उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी हे आनिता व विशाल या धाडसी नवरा बायको व जोगदंड पाटिल यांचा सत्कार करतानी बोलत होते.

या वेळी परभणीचे पोलीस अधीक्षक जंवत मिना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मक सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुभाष राठोड, पोलीस निरीक्षक भागीजी चोरंमले, सहायक पोलीस निरीक्षक प्रविन धुमाळ यांनी आनिता व विशाल भोसले यांना संन्मानित करुन मराठवाडा साथी या पेपरचे संपाद चंदुलाल बियाणी आणी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांचे आभार मानले. गेली पंधरा दिवसा पुर्वी पुण्यातून इनिव्हा गाडी परभणी येथे भाड्याने आणली होती परंतू ,परभणी चुडावा येथुन आरोपींनी गाडी चोरुन नेली होती, गाडी चोरी गेल्यानंतर गाडीची बातमी परभणी जिल्हात वा-यासारखी पसरली होती. परभणी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी अत्यंत प्रयत्न करत होते. परंतू आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून गाडी पकडुन देणाऱ्यास बक्षीस दिले जाईल.या विषयावर संपूर्ण परभणी जिल्हातील गरीब कुटुंबातील लोक गाडीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते.

अशातच एका गरीब कुटुंबातील विशाल भोसले व त्यांची पत्नी अनिता भोसले आणी जोगदंड पाटिल यांनी जिवाची परवा न करता गाडी चोराला पकडुन पोलीसाच्या ताब्यात दिले, चुडावा पोलीसांनी विशाल भोसले व आनिता भोसले यांचे परभणी पोलीसांनी कौतुक केले.

सदर गाडी चोरी गेल्यानंतर परभणी जिल्हाचे पोलीस अधीक्षक जंवत मिना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मक सुदर्शन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्ग दर्शनाखाली एल. सी .बी पोलीस सह्य निरीक्षक आलेवार यांची टिम व पुर्णा पोलीस स्टेशनचे सह्य भागोजी चोरमले व सह्या पोलीस निरीक्षक प्रविन धुमाळ यांच्या तपास पथकानी मोठी कांमगीरी करुन तीन चार चाकी गाड्या व एक बुलट ताब्यात घेऊन अटक केलेल्या व्यक्तींकडून जप्त केल्या आहेत. सदर MH.12.0800 या इनिव्हा गाडी मालक सचिन टिळेकर (उरुळी कांचन) व त्यांच्या घरच्या लोकांनी साहित्यिक नामदेव भोसले यांच्या टिमचे कौतुक केले.

धाडसी जोडी विशाल भोसले व कविता भोसले यांना दहा हजार ऐकशे एक रुपया शाल श्रीफळ व पुल पोशाख देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले, सुदेश टिळेकर, राजेद्र टिळेकर, सचिन टिळेकर , शिवाजी ननवरे, राजेद्र कांचन यांनी परभणी जिल्हाचे पोलीस अधीक्षक जंवत मिना व त्यांचे तपास पथक यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

Previous articleमनसेचे आळंदी शहराध्यक्ष अजयभाऊ तापकीर यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिर संपन्न
Next articleघोडेगाव पेठ जिल्हा परीषद गटातील विकास कामांसाठी ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध