घोडेगाव पेठ जिल्हा परीषद गटातील विकास कामांसाठी ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध

सिताराम काळे

– घोडेगाव पेठ जिल्हा परीषद गटातील स्मशानभुमी शेड, बंदिस्त गटार, अंगणवाडी बांधणे, शाळा खोल्या बांधणे आदि विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतुन शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदशनाखाली शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांच्या प्रयत्नांतून ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचे उपतालुका प्रमुख विजय घोडेकर, घोडेगाव शहर संघटक उल्हास काळे यांनी सांगितले.

घोडेगाव प्रकाशझोत बसविणे १५ लक्ष, कोळवाडी-पानसरेवस्ती पाझर तलाव दुरूस्ती २५ लक्ष, गावरवाडी स्मशानभुमी सुधारणा ३ लक्ष, खालची दरेकरवाडी ते ठाकरवाडी रस्ता सुधारणा करणे २० लक्ष, धोंडमाळ-शिंदेवाडी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १५ लक्ष, आंबेदरा स्मशानभुमी शेड ६ लक्ष, ढाकाळे कुत्तरवाडी रस्ता सुधारणा ५० लक्ष, पिंपळगाव घोडा मुक्तादेवी मंदिरामागे रस्ता करणे १० लक्ष, चिंचोडी-नवखंड-पागांरा रस्ता करणे १४ लक्ष, पेठ वाडया वस्त्यांवर प्रकाशझोत बसविणे १० लक्ष, पेठ संभाया वस्तीत रस्ता करणे २० लक्ष, चिंचोडी-लांडेवाडी कुरवंडी प्रजिमा -१३ रस्ता सुधारणा करणे ४० लक्ष, पिंपळगाव म्हाळुंगे येथे लिंबाचा मळा अंतर्गत गटार योजना ३ लक्ष, निघोटवाडी चिंचपुरेमळा बंदिस्त गटार योजना ५ लक्ष.

पिंगळगाव घोडे ठाकरवाडी, थुगाव गावठाण, कुरवंडी मतेवाडी, कुरवंडी गटेवाडी येथे अंगणवाडी बांधण्यासाठी प्रत्येकी ८ लक्ष ५० हजार रूपये. कारेगाव, भावडी येथे शाळा खोल्या बांधण्यासाठी प्रत्येकी ७ लक्ष ५० हजार रूपये, ढाकाळे, चिंचोली, पेठ, गिरवली, भावडी येथे शाळा खोल्या दुरूस्ती साठी ३ लक्ष रूपये मंजुर झाले आहेत. तसेच भैरवनाथ भजनी मंडळ लांडेवाडी-पिंगळवाडी, स्वयंभू गणेश भजनी मंडळ खटकाळवस्ती, गणराज भजनी मंडळ करंदी, काळुबाई देवस्थान भजनी मंडळ धामणी या भजनी मंडळांना भजनी साहित्य मंजुर झाले असल्याचे उल्हास काळे यांनी सांगितले.

Previous articleआनिता व विशाल या धाडसी दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद- ऊमाकांत पारधी
Next articleवारु केंद्रातील विद्यार्थ्यांना मोफत वाचनासाठी पुस्तके वाटप