शरद पवारांना शेकापचे कार्यकर्ते भाई मोहन गुंड यांचे मार्मिक पत्र

अतुल पवळे – बीड जिल्ह्यामध्ये तालुका आणि जिल्हा शासकीय समित्यांमध्ये शेतकरी कामगार पक्ष व डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना समित्यात स्थान न दिल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड यांनी पवार साहेब पत्राच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत टिका केली आहे.

2019 लोकसभा विधानसभेत जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सीपीएम,सीपीआय, इतर घटक पक्ष माझे नेते आ.भाई जयंत पाटील यांच्या व घटक पक्षातील नेत्यांच्या आदेशाचे पालन करत जातीवादी शक्तीला रोखवण्यासाठी जमेल तेवढे प्रमाणीक प्रयत्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी केले.

आपल्या कौशल्याने चाणक्य नितीने आपण राज्यामध्ये सत्ता ही स्थापन केली मात्र आघाडीतील मित्र पक्ष म्हणुन आमच्या नेत्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी तर नाहीच दिली,साहेब ते तुम्हाला माहीतच आहे. कुठेतरी शासकीय तालुका समित्या, जिल्हा समित्या मध्ये पुरोगामी घटक पक्ष म्हणून पडतीच्या काळात अनेक वेळा तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बीड जिल्ह्यासह राज्यात कुठे सामावून घेतलं आहे का? हे जरा आपल्या पालकमंत्र्यांना आपण विचारावे.
साहेब आपण राज्यातील एकमेव पुरोगामी नेतृत्व आधारवड असणार व्यक्तिमत्व आहात, शेतकरी कामगार पक्ष अनेक वेळा आपल्या पाठीशी उभा राहिला आहे सत्तेचा वाटा मिळावा या साठी नाही तर भांडवलशाही जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी, साहेब मी छोटासा कार्यकर्ता म्हणून आपल्या कडुन इच्छा व्यक्त करतो शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भविष्यात ही कुठली सत्तेची अपेक्षा न ठेवता पुरोगामित्वाच्या मुद्द्यावर आम्हाला आयुष्यभर मदत करत राहावी अशी घोषणा करावी,नक्कीच आम्ही पुरोगामित्वाच्या गोंडस नावाखाली तुमच्या शब्दाचा मान ठेऊ.

साहेब जातीवादी पक्ष सत्तेत येऊ नयेत तुमच्या पक्षा सारखा पुरोगामी पक्ष सत्तेत जावा या साठी तुम्ही कुठली ही विचारसरणी असलेल्या (भाजप शिवसेना इतर ) पक्षाशी हात मिळवणी केली तरी आमचा आक्षेप राहणार नाही. तुम्ही कधी काळी शब्द दिले असले तरी ते ही आम्ही विसरुन जाऊन जातीयवादी पक्ष डोळ्या समोर ठेवून तुमच्या पाठीशी उभा राहु. आम्हाला काय मिळाले या पेक्षा आम्ही भांडवलदारी जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखले यात आम्ही कार्यकर्ते समाधान मानुन तुम्हाला साथ देत राहू.
फक्त आत्ता जसे सोबत आहात तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोबत राहावे अशी फक्त घोषणा करा एवढेच आपल्यासारख्या जाणत्या राजाकडून माफक अपेक्षा. अशी पत्र शरद चंद्रजी पवार यांना पाठवलेल्या पत्रात भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleवरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस मेडल
Next articleमनसेचे आळंदी शहराध्यक्ष अजयभाऊ तापकीर यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिर संपन्न