प्रत्येकाने चिमण्यांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज-डॉ. मोहन वाघ

Ad 1

अमोल भोसले उरळी कांचन

एक घास चिऊताईचा असे म्हणून आई आपल्या बाळाला एक एक घास मायेने भरवते. एकेकाळी प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असलेला एक पक्षी म्हणजे चिमणी. कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिमणी जोडली गेलेली आहे. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. यासाठी प्रत्येकाने चिमण्यांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज आहे. अन्यथा बालपणी ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे एक होती चिऊताई असे दुदैवाने म्हणण्याची वेळ भविष्यात येईल आणि हाच चिमणी दिनाचा खरा सांगावा आहे असे हवेली तालुका पत्रकार संघाचे मानद सदस्य डॉक्टर मोहन वाघ यांनी केले.

वृक्षारोपण संवर्धन समिती म्हातोबाची आळंदी (ता.हवेली) तसेच हवेली तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने एक घास चिऊचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी डॉ. वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर, समितीचे अध्यक्ष संदीप शिवरकर, पत्रकार तुळशीराम घुसाळकर, सचिन माथेफोड, सचिन सुबे, शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य सायली शिवरकर, केशव तिखे, गणेश जवळकर, त्याचसोबत आळंदी म्हातोबा उपसरपंच श्रीहरी काळभोर, सदस्य पारस वाल्हेकर, विनायक जवळकर, सखाराम थोरात, दयानंद शिवरकर, तेजस शिवरकर, समितीचे सदस्य संतोष शिवरकर, महेश शिवरकर, गणेश शिवरकर, प्रविण राजगुरु आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येकानी टेरेसवर खिडकी मध्ये चिमण्या साठी धान्य पाणी ठेवणे काळानुसार आवश्यक झाले आहे. हवेली तालुका पत्रकार संघ सातत्याने स्तुत्य उपक्रम घेत आहे असे शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक – सूत्रसंचालन कार्यक्रमाचे सचिन माथेफोड यांनी केले तर आभार संदीप शिवरकर यांनी मांडले