आळंदी नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी भाजपाची प्रतिष्ठा पणाला

आळंदी : आळंदी नगरपरिषद मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांची स्विकृत नगरसेवक पदावर संधी देण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे.

आळंदी नगरपरिषदचे भाजपचे स्विकृत नगरसेवक संदीप रासकर यांनी स्विकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवड (दि.२४ ) रोजी होणार असून या जागेवर भाजप मधील निष्ठावंता बरोबर पक्षा बाहेरील व्यक्ती सुध्दा इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तीची स्विकृत नगरसेवक पदावर वर्णी लावण्यासाठी भाजप नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

येणार्‍या आळंदी नगरपरिषद निवडनुकीत काही ठराविक प्रभागात हभप महाराज मंडळींचे अधिक मतदान असल्याने एखाद्या अभ्यासू महाराज किंवा माऊलींच्या सेवेकर्याची सुध्दा स्विकृत नगरसेवक पदी वर्णी लावण्यासाठी काही नगरसेवक पक्षा कडे दबाव टाकू शकतात, यामुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी जाणार का..? तर काही भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की जे नेते पक्षाच्या पदावर कार्यरत होते तेव्हा पक्षाचे काम करत होते आणि आता पदावर नसताना आळंदीत पक्षाचा कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने, पक्षाच्या प्रचाराला जाणून बुजून पाठ फिरवली जाते अशा नेत्यांना स्विकृत नगरसेवक पदावर संधी देऊ नये जे पक्षवाढीसाठी निष्ठेने काम करतात अशा सर्व सामान्य कार्यकर्त्यांला स्विकृत नगरसेवक पदावर संधी देण्यात यावी अशी मागणी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

स्विकृत नगरसेवक पदावर भाजपने यापुर्वी दिनेश घुले, संतोष गावडे आणि राजगुरुनगर परिषदेचे माजी स्विकृत नगरसेवक संदीप रासकर यांना तर शिवसेनेने माजी जिल्हा प्रमुख राम गावडे यांच्या पत्नी सविता गावडे आणि राणी रासकर यांना संधी दिली आहे.

आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि गटनेते पांडुरंग वहीले हे कोणाची शिफारस करतात हे पाहणे गरजेचे आहे.

Previous articleसबनीस विद्यामंदिरातील शिक्षक संजय कोकणे यांचे कंटेनरच्या धडकेत अपघाती निधन
Next articleप्रत्येकाने चिमण्यांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज-डॉ. मोहन वाघ