सबनीस विद्यामंदिरातील शिक्षक संजय कोकणे यांचे कंटेनरच्या धडकेत अपघाती निधन

नारायणगाव (किरण वाजगे)  येथील गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिरातील शिक्षक संजय पांडुरंग कोकणे (वय. ४७) यांचे शुक्रवार (दि १९ )रोजी कंटेनरच्या धडकेत अपघाती निधन झाले . त्यांच्यामागेवडील ,भाऊ ,पत्नी ,तीन बहिणी ,मुलगा व दोन मुली असा परिवार आहे .

काल (दि.१९ ) रोजी रात्री १०. १५ वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळील हॉटेल श्रीराज समोर संजय कोकणे हे स्कुटी (एम एच १४ एफएस ६५४३ ) वरून घरी जात होते.
यावेळी पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जात असलेल्या कंटेनर (एम एच ४६ बीबी ४६४१) ची धडक होऊन ते जागीच मृत्यूमुखी पडले.

Previous articleसावरदरी गावच्या राजकारणात जिवलग मित्रच झाले गाव कारभारी: एक सरपंच,दुसरा उपसरपंच,तिसरा पोलिस पाटील
Next articleआळंदी नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी भाजपाची प्रतिष्ठा पणाला