सावरदरी गावच्या राजकारणात जिवलग मित्रच झाले गाव कारभारी: एक सरपंच,दुसरा उपसरपंच,तिसरा पोलिस पाटील

Ad 1

चाकण- सावरदरी उद्योग नगरीच्या राजकारणात तिघे जिवलग मित्रच गाव कारभारी झाले आहेत. एक सरपंच , दुसरा उपसरपंच आणि तिसरा पोलिस पाटील … नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत खेड तालुक्यातील महत्वाची मानली जाणारी ग्रामपंचायत सावरदरी या ठिकाणी लहानपणापासून एकत्र असलेले मित्र सावरदरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे होते.

या आधी कधीच सत्ता नसताना गेली २५ वर्षे सत्तेत सहभागी असलेल्या प्रस्थापितांना धक्का देत विरोधकांचा ०/७ असा पराभव केला .

तरूणांच्या सहकार्याने गावातील जेष्ठ नागरिकांच्या विचाराने आणि गावातील महिला भगिनीच्या आशीर्वादाने सत्तेत आलो असल्याचे सरपंच भरत तरस, उपसरपंच संदिप बाळासाहेब पवार यांनी सांगितले.


पोलिस पाटील राहुल साकोरे यांनी सांगितले की येणाऱ्या काळात सावरदरी गावचा सर्वांगीण विकास केला जाईल बेरोजगार तरुणांसाठी लढा उभारला जाईल व तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.