नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हाँटेल,दुकानदारांवर घोडेगाव पोलीसांची कडक कारवाई

सिताराम काळे

– घोडेगाव परीसरामध्ये कोरोना बाधित रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असताना घोडेगाव पोलीसांनी कडक कारवाईचा बडगा उगारत जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करणारे फळविक्रेते, हॉटेल मालक, दुकानदार यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारकडून उपाय योजना सुरू आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी नियम व अटी घालुन दिलेल्या आहेत. मात्र घोडेगाव येथील फळविक्रेता, हॉटेल मालक, दुकानदार व शिनोली येथील हॉटेल मालक यांच्याविरूध्द घोडेगाव पोलीसांनी मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना या विषाणुचा संसर्ग पसरण्याची जाणीव असतानाही तोंडाला मास्क न लावता, कोणतेही सोशल डिस्टन्सचे पालन न करता दुकानामध्ये पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी करून त्यांचेशी संभाषण करून फळविक्रि व हॉटेल मधील पदार्थ विक्री करत यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे जाणीव पुर्वक उल्लंघन करत केले असल्याने त्यांच्याविरूध्द सहायक फौजदार जे. आर. वाजे यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युवराज भोजणे, पोलीस हवालदार देवराम धादवड, पोलीस नाईक संदिप लांडे करत आहे.

Previous articleकोविड लसीकरणामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा – आमदार अशोक पवार
Next articleसावरदरी गावच्या राजकारणात जिवलग मित्रच झाले गाव कारभारी: एक सरपंच,दुसरा उपसरपंच,तिसरा पोलिस पाटील