पवनाधरणाच्या जागेवर अतिक्रमण ; पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

आपटी धामणदरा येथील पवनाधरणाच्या जागेवर अतिक्रमण करुन बांधलेले फार्महाऊस
आपटी धामणदरा येथील पवनाधरणाच्या जागेवर अतिक्रमण करुन बांधलेले फार्महाऊस

 पिंपरी चिंचवड व मावळ तालुक्याला वरदान ठरलेले पवनाधरण धरणाच्या आतिल भागामधील आपटी , धामणदरा, गेंव्हडे या भागामध्ये पवनाधरणाच्या जागेवर धंनदाडग्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करत बगले, फार्महाऊस उभे केले आहे.तर काही ठिकाणी पवनाधरणातुन पवनाधरणाचे पाणी कमी झाले असल्याने मोकळ्या जागेवरुन शासनाचे कोणतेही धोरण नसताना धंनदाडगे मात्र या पवनाधरणाच्या जागेतून मुरूम, मातीची मोठ्या प्रमाणावर चोरी करुन आपल्या फार्महाऊस व बंगल्याला भर करण्यासाठी वापरत असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी पवनाधरणाच्या जागेतून फार्महाऊस वर ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून रस्ते तयार केले आहे.

यावर विचारणा केली असता आरेरावी ची भाषा वापरत धमकी दिली जात आहे.याकडे पवना पाटबंधारे विभागाचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.तरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर अशा बेकायदेशीर बांधकामावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे.

Previous articleमहिला शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे या़ंच्याविरोधात गुन्हा दाखल
Next articleवाघोलीत गेले दोन दिवस सलग ५१ कोरोना रुग्ण तर आज २६ रुग्ण :कोविड सेंटर नसल्यामुळे कोरोना रुग्णांचे हाल