वाघोलीत गेले दोन दिवस सलग ५१ कोरोना रुग्ण तर आज २६ रुग्ण :कोविड सेंटर नसल्यामुळे कोरोना रुग्णांचे हाल

वाघोली (ता. हवेली) येथे मागील दोन दिवसामध्ये आत्तापर्यंतची विक्रमी कोरोना रुग्णांची वाढ झाली तर आज देखील २६ नवीन कोरोना बांधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे वाघोलीकारांची काळजी दुपटीने वाढली आहे. मागील दोन दिवसात वाघोलीत १६ मार्च रोजी ५१ तर १७ मार्च रोजी पुन्हा ५१ कोरोना रुग्णांची वाढ झाल्याची नोंद झाली तर आज २६ रुग्णांची वाढ झाली आहे तर आज दिवसामध्ये २४ रुग्ण बरे झाले आहेत. वाघोलीत एकूण ३३८५ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत यापैकी ३१४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २११ रुग्ण अॅक्टीव आहेत तर ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर परिसरातील आव्हाळवाडी केसनंद ,मांजरीखुर्द, कोलवडी, निरगुडी,वडगाव शिंदे येथे देखील रुग्ण संख्या वाढू लागली आहे.वाढत्या रुग्ण संख्येमुळे परिसरातील खाजगी दवाखाने देखील फुल झाल्याचे चिञ पाहयला मिळत आहे.तर मिळालेल्या माहिती नुसार वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत बीजेएस स्टेशन मध्ये दररोज फक्त ८० रुग्णांचेच स्वंब घेण्यास मान्यता आहे .वाढती रुग्ण संख्या पाहती ही संख्या देखील वाढून घेणे गरजेचे असल्याचे नागरिक सांगतात

वाघोली व परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे खाजगी हाॕस्पिटल देखील फुल झाल्याने रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड भेटत नाहीत त्यामुळे वाघोली मधील बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा त्वरित चालू करावे या साठी आरोग्य विभागाला पञ व्यवहार केला आहे .प्रशासनाकडून कोविड सेंटर लवकरात लवकर चालु केले नाही तर भाजपच्या वतीने आंदोलन करणार आहे.

संदीप सातव, भाजप युवा मोर्चा

Previous articleपवनाधरणाच्या जागेवर अतिक्रमण ; पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
Next articleभाजपचे आमदार नितेश राणेंनी सरदेसाई केलेल्या आरोपा निषेधार्थ वाघोलीत आंदोलन