मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी दिलेल्या टॅबची शिक्षिकेच्या घरातून चोरी

प्रमोद दांगट

पेठ ( ता. आंबेगाव ) येथे मुलींना ऑनलाइन शिक्षणासाठी दिलेल्या टॅब ची शिक्षिकेच्या घरातून झाल्याची घटना (दि.10) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत शिक्षिका अनिशा कमलेश धुमाळ ( रा.पेठ ता.आंबेगाव ,पुणे ) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी अनिशा धुमाळ या पेठ येथील विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत असून त्यांना शाळेतील मुलाला ऑनलाईन शिकविण्यासाठी नांदी फाउंडेशन कडून लेनोवो कंपनीचा टॅब मिळाले आहेत.(दि.10) रोजी त्यांनी मुलांना ऑनलाइन शिकवल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी घरातील हॉलमध्ये टॅब चार्जिंगला लावला होता व दरवाजा बारीक साखळीने बंद करून त्या झोपल्या होत्या.सायंकाळच्या सुमारास उठल्यानंतर त्यांना टॅब दिसला नाही.त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून आला नाही कोणीतरी टॅब चोरून नेला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यानी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक नाडेकर करत आहे.

Previous articleपंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टापूर गावाचा सर्वागीण विकास- राजेंद्र काळभोर
Next articleउच्चशिक्षित मुलींनी आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा