उच्चशिक्षित मुलींनी आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा

राजगुरूनगर- संगमनेर येथील मांढरे दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस उच्चशिक्षित मुलींनी पुन्हा लग्न करून साजरा करून मुलींनी आई-वडिलांना अनोखी भेट दिली

आपल्या आईवडिलांचा पुन्हा हळदी समारंभ ,साखरपुडा व लग्न लावून लग्नाचा ४५ वा वाढदिवस साजरा केला. वडील काशिनाथ शिवराम मांढरे सेवानिवृत्त, प्राथमिक शिक्षक आई सौ हिरा काशिनाथ मांढरे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका यांनी संगमनेर तालुक्यात ३७ वर्ष शिक्षकी पेशात चांगल्या प्रकारे सेवा केली असंख्य संगमनेर तालुक्यात विद्यार्थी घडविले त्यांच्या चारही उच्चशिक्षित मुली प्राध्यापक सौ रूपाली सुरेश घनवट,एम एससी (बी एड) श्री प्राध्यापक सौ दीपाली मधुसूदन दाते, कलाशिक्षक सौ स्मिता पराग महाडिक एम एससी (कृषी) सौ श्वेता दिनेश काकडे एमटेक ( कृषी) यांनी आपल्या आई-वडिलांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या आई वडिलांचा पुन्हा विवाह करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

यावेळी गेनू नाना वर्पे, डॉ. विशाल सातपुते, उद्योजक शाम इंगळे ,प्रा सौ विजया सातपुते, सौ कमल वर्पे ,सौ कविता गुंजाळ,सौ चंदाताई फटांगरे, सौ पुष्पा मांढरे, बाळकृष्ण मांढरे गुरुजी, अण्णासाहेब गुंजाळ, भोला पवार,महाजन सर, सुरज फटांगरे, संजय शिंदे,प्रसिद्ध रांगोळीकार , सोनवणे मेजर, डॉ. पराग महाडिक,उद्योजक दिनेश काकडे, आर्किटेक्चर मधुसूदन दाते इत्यादी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते

Previous articleमुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी दिलेल्या टॅबची शिक्षिकेच्या घरातून चोरी
Next articleकेतन निकाळजे यांची भीम आर्मी संघटनेच्या हवेली तालुका कार्याध्यक्षपदी निवड