पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टापूर गावाचा सर्वागीण विकास- राजेंद्र काळभोर

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद शाळा, माळवाडी अष्टापूर ( ता. हवेली ) येथे मासिक बैठक पार पडली. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य मानद सदस्य डॉ. मोहन वाघ, प्रभाकर क्षिरसागर, तुळशीराम घुसाळकर, जयदीप जाधव, संदीप बोडके, जितेंद्र आव्हाळे, सुखदेव भोरडे, सुनिल सुरळकर, गायत्री भंडारी, रियाज शेख, धनराज साळुंके, हनुमंत चिकणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील प्रत्येक गावातील विविध नागरी समस्यांची जाणीव पत्रकारांना व्हावी. सर्वसामान्य नागरिकांना आपले जीवन जगताना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या, अडचणी दृक श्राव्य माध्यमातून शासनापुढे मांडाव्यात. शासनाच्या सहकार्याने या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा. या समस्या सोडवण्यासाठी पत्रकारांनी खारीचा वाटा उचलावा, शासनाच्या विविध खात्यांशी व तेथील आधिका-यांशी समन्वय साधून हे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. अशी या मागची भूमिका आहे. तसेच ज्या गावाने कुठल्याही विषयात चांगले व उल्लेखनीय काम केले असेल तेथील गावक-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी असा ही मानस आहे.  म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावात पत्रकार संघाची मासिक बैठक आयोजित करण्याचे नियोजन आगामी काळात करण्यात येणार आहे.

 ग्रामस्थांच्या वतीने बोलताना माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप यांनी गावाला अधिकृत गावठाण मिळावे, पाणंद रस्ता खुला करून मिळावा आदी मागण्या मांडल्या. या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी हवेली तालुका पत्रकार संघ अष्टापुर ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल अशी ग्वाही मी यावेळी संघटनेच्या वतीने ग्रामस्थांना दिली. अष्टापुर ग्रामस्थांनी गावात वेगवेगळ्या प्रकारचे हजारो वृक्ष लावले आहेत. अजूनही वृक्षारोपण करण्याचे त्यांचे नियोजन आहे. या बद्दल अष्टापुर ग्रामस्थ कौतुकास पात्र आहेत. काल पत्रकार संघाच्या सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, उपसरपंच कालिदास कोतवाल, माजी सरपंच अण्णासाहेब कोतवाल, माजी उपसरपंच श्यामराव कोतवाल, आबासाहेब कोतवाल, योगेश जगताप, सोमनाथ कोतवाल, सुभाष कोतवाल, संजय कोतवाल, गणेश कोतवाल, भैरवनाथ प्राथमिक दिंडीचे सचिव संजय कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते महेश ढवळे, नवनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, मनोज कोतवाल, उमेश कोतवाल, सचिन माकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleएस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोशल मिडीया सेल कार्यकारीणी निवडीसंदर्भात पुण्यात महत्वपुर्ण बैठक संपन्न
Next articleमुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी दिलेल्या टॅबची शिक्षिकेच्या घरातून चोरी