तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल

सिताराम काळे,

-घोडेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील पिंगळवाडी येथील एका बंगल्यात बिगर परवाना बेकायदा तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना पंधरा जणांना पोलीसांनी पकडले. पोलीस शिपाई सोमनाथ गवारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंगळवाडी (ता. आंबेगाव) येथील इंण्डेन गॅस एजन्सीचे पाठीमागील एका बंगल्यामध्ये जुगार खेळत असल्याची खबर पोलीसांना मिळताच त्यांनी मौजु्दीन कबरदीन मुजावर, विक्रम बबन काळे, जयसिंग सखाराम फलके (सर्व रा. घोडेगाव) समिर भानुदास वाळुंज, दिलीप सोनु केंगले, चेतन तानाजी बाणखेले (सर्व रा. मंचर) प्रदिप श्रीधर सावंत, दत्तात्रय उल्लास लोहोट (सर्व रा. गंगापुर खुर्द) मंगेश खंडू शेवाळे (रा. लांडेवाडी) सोमनाथ रोहिदास काळे (रा. धोंडमाळ) परशुराम नामदेव धनवटे (रा. राजगुरूनगर) अमोल विलास चासकर (रा. चास) रामदास बाळकृष्ण हत्ते (रा. शिनोली) गोकुळ शांताराम लोहोट (गंगापुर बु.) यांना तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना ताब्यात घेतले.

यावेळी रोख रक्कम २९ हजार ३९० रूपये तसेच ८० हजार रूपयांच्या हिरो होंडा मोटार सायकली, ७० हजार रूपयांची रॉयल इंनफिल्ड कंपनीची बुलेट, ७० हजार रूपयांच्या होंडा कंपनीच्या दोनचाकी गाडया, ३० हजार रूपयांची बजाज टु व्हीलर असे एकंदरीत २ लाख ७९ हजार ४१० रूपयांचे साहित्य व रोख रक्कम पोलीसांनी जप्त केली आहे. संबंधित कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार व पोलिस कर्मचारी यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहू शिंगाडे करत आहे.

Previous articleशिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांचे निधन
Next articleएस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोशल मिडीया सेल कार्यकारीणी निवडीसंदर्भात पुण्यात महत्वपुर्ण बैठक संपन्न