Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अमोल भोसले,पुणे- मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली मराठी पञकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या सोशल मिडीया संघटनेची स्थापन करण्यासंदर्भात पुणे जिल्हा पञकार संघाच्या कार्यकारिणीची महत्वपुर्ण बैठक काल (दि. १४ ) रोजी आय बी हाँल ,पुणे येथे संपन्न झाली .
या बैठकीत सोशल मिडीया सेल कार्यकारीणी निवडी संदर्भात व न्यूज पोर्टल व युट्यूब पत्रकारा़ंना येणाऱ्या अडचणी व महत्त्वपुर्ण विषयावर चर्चा झाली.यावेळी मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी उपस्थित राहून धोरणात्मक मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर , जिल्हा समन्वयक सुनील नाना जगताप ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज,जिल्हा महिला प्रतिनिधी श्रावणी कामत,जिल्हा प्रतिनिधी अर्जुन मेदनकर,हुतात्मा राजगुरु पञकार संघ चाकण अध्यक्ष हनुमंत देवकर,सर्वश्री निलेश जगताप , प्रमोद गव्हाणे, सूरज साळवे,बाबाजी पवळे,शरद राजगुरु,मनिषा राजगुरु,समीर आत्तार,रफिक इनामदार,सुनील पवार आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा पञकार संघाचे संपर्क कार्यालय त्वरीत सुरु करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. आभार हनुमंत देवकर यांनी मानले.
Download WordPress Themes Nulled and plugins.