शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांचे निधन

नारायणगाव -(किरण वाजगे)

बेल्हे ( ता जुन्नर) येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ ( वय ५६ वर्ष) यांचे आज ह्रुदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बेल्हे गावासह परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ तसेच शिवसैनिकांवर शोककळा पसरली आहे.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामधील बेल्हे येथील राजाभाऊ गुंजाळ हे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. त्यांनी बेल्हे जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद निवडून लढवली होती त्यामध्ये ते विजयी झाले होते. ते पंचायत समितीच्या निवडणूकीतही विजयी झाले होते व त्यानंतर त्यांना पंचायत समितीच्या सभापतीपदावर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांच्या आकस्मीक निधनामुळे गुंजाळ कुटुंबीयांबरोबरच बेल्हे ग्रामस्थ व शिवसैनिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Previous articleदिलेला शब्द पुर्ण करणारे आमदार अशोक बापु पवार :१८ मार्च पासून शिरुर ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण उपलब्ध होणार
Next articleतीन पत्ती जुगार खेळणाऱ्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल