मंचर येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

प्रमोद दांगट

मंचर (ता.आंबेगाव ) येथे २८ जानेवारी रोजी स्टेट बँकेचे कॅश डिपॉझिट मशीनसह एटीएम मशीन मधील १९ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या चोरटयांना मंचर पोलिसांनी राजस्थान राज्यातून अटक केली आहे.

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची मंचर शाखेचे एटीएम मशीन , एक कॅश डिपॉझिट मशीन व एक पासबुक प्रिंटिंग मशीन दि.२८ जानेवारी रोजी पहाटे ३:३० च्या दरम्यान सहा चोरट्यांनी १९ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह लंपास केले होते . या चोरट्यांचा शोध मंचर पोलीस घेत असताना या गुन्ह्यातील चोरटे राजस्थान राज्यातील अलवरा जिल्ह्यातील लक्ष्मणगड पोलीसानी एटीएम चोरीच्या गुन्ह्यांत पकडले होते. त्या पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मंचर येथील एटीएम चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानुसार तेथील पोलिसांनी मंचर पोलीस ठाण्यात संपर्क करून सदर गुन्ह्यातील चोरटे राजस्थान राज्यात अलवरा जिल्ह्यातील लक्ष्मणगड पोलीसानी पकडल्याची माहिती दिली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबातें व पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस पोलीस नाईक विलास साबळे, पोलीस नाईक राजेंद्र हिले, विठ्ठल वाघ, महेश भालेकर, अमर वंजारी, अंकुश मिसाळ, शांताराम सांगडे यांचे पथकाने राजस्थान येथे जाऊन या चोरट्याना मंचर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. त्यानुसार आरोपी १) अनवर पुत्र अमली खां ( वय २५ वर्ष ,रा.तावडू ,हरियाणा ), २) मुस्ताफा पुत्र महमूद जाती मेव ( वय -२३ वर्ष , रा. माचरौली, हरियाणा ) ३) तालीम पुत्र तालीम जाती मेव ( वय २६ वर्ष ,रा. दौहज ,हरियाणा ), ४) इरसाद पुत्र खुरशीद जाती मेव ( वय २५ वर्ष ,पाली ठाणा गोपालगड, जिल्हा भरतपूर ) अशी आरोपींची नावे आहेत .या चोरटयांवर राजस्थान येथील राज्यातील अलवार जिल्यातील लक्ष्मण गड पोलिस ठाण्यात भा.द.वि.कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे. तर मंचर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भा.द.वि.कलम ३७९, ४२७, ३४ सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामासाठी मा.न्यायालयाचे आदेशाने मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पो. नि. सुधाकर कोरे यांनी सांगितले.

Previous articleसुजाता पवार यांच्या कल्पनेतून ‘महिला दिनानिमित्त’ निरक्षर महिलांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग सुरु
Next articleकोयाळीच्या ऋतुजा गिलबिलेची महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघात निवड