कोयाळीच्या ऋतुजा गिलबिलेची महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघात निवड

राजगुरूनगर- कोयाळी तर्फे वाडा येथील कु ऋतुजा रवींद्र गिलबिले(वय20) हिची नुकतीच राजस्थान (जयपूर) येथे होणाऱ्या सामन्यासाठी महाराष्ट्र महिला रणजी क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.

ऋतुजा गिलबिले हिचे मूळ गाव कोयाळी तर्फे वाडा असून चासकमान धरणात तिचे कुटुंब विस्थापित झाले आहे.ऋतुजा गिलबिले हिच्या वडिलांना क्रिकेटची प्रचंड आवड असल्याने त्यांनी ऋतुजाला खेळासाठी प्रेरणा दिली.त्यामुळेच ऋतुजा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळत आहे.ही अभिमानाची बाब आहे.

ऋतुजाने आपल्या क्रिकेट खेळाची सुरुवात कडूस क्रिकेट अकॅडमीमधून केली.सध्या ती पुणे एच पी अकादमी येथे सराव करत आहे.तिला प्रशिक्षक म्हणून ललित मुसळे,व्ही.पाटील,सुभान शेख,भूषण सर,तिकोने सर यांचे मार्गदर्शन लाभले.सोबतच खासगी प्रशिक्षक म्हणून हेमंत किणीकर यांचेही मार्गदर्शन लाभले.
या यशात तिला संतोष बारणे,हेमंत पाटील,ऍड संदीप शिंदे,यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

ऋतुजाने घेतलेले कष्ट व चिकाटी यामुळे ती राज्य व राष्ट्रीय स्तरावर सामन्यासाठी खेळत आहे ही कौतुकाची बाब आहे.ग्रामीण भागातील खेळाडूंना ही प्रेरणादायी बाब आहे.प्रयत्न,सराव, चिकाटी यामुळेच यश लाभले हे ऋतुजाने सिद्ध करून दाखवले आहे.या यशामुळे ऋतुजाने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Previous articleमंचर येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरणाऱ्या चोरट्यांना अटक
Next articleसंत गोरोबा शिक्षण संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा