सुजाता पवार यांच्या कल्पनेतून ‘महिला दिनानिमित्त’ निरक्षर महिलांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग सुरु

अमोल भोसले,उरुळी कांचन

‘जागतिक महिला दिन ‘त्यानिमित्ताने सुजाता पवार (सदस्या,पुणे जि.प.)यांच्या कल्पनेतून साकारला प्रौढ साक्षरता वर्ग, या वर्गासाठी आज पहिल्याच दिवशी १३ विद्यार्थिनी महिलांनी उपस्थिती लावली.

आम्हाला खूप चांगली संधी उपलब्ध झाली त्या संधीचा आम्ही नक्की फायदा घेणार असा निश्चय महिलांनी दाखवला. या वेळी नगरसेविका सुरेखा शितोळे, साधना शितोळे, ललिता पोळ, श्रुतिका झांबरे, अनुपमा दोशी, राधिका घाटगे यावेळी उपस्थित होत्या.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. महिला दिनानिमित्ताने गुलाबपुष्प देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.

अनुपमा दोशी यांनी आपल्याबरोबर इतरही मैत्रिणींना या प्रौढ साक्षरता वर्गात सहभागी करुन घेण्याविषयी महिलांना आवाहन केले तर ललिता पोळ यांनी घरोघरी जावून महिलांना जमवण्याचे अवघड काम पार पाडले.

साधना शितोळे यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. महिलांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर चर्चेने तोडगा काढला. योग्य त्या सूचना दिल्या अशाप्रकारे यशस्वीरित्या सुजाता पवार कल्पनेतला साक्षरता वर्ग आकार घेऊ लागला.

Previous articleघोडेगाव येथे घरातून ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र व ५ हजार चोरीला ; घरकाम करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार
Next articleमंचर येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरणाऱ्या चोरट्यांना अटक