घोडेगाव येथे घरातून ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र व ५ हजार चोरीला ; घरकाम करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार

प्रमोद दांगट ,मंचर

घोडेगाव ( ता. आंबेगाव ) येथील गावच्या हद्दीत असलेल्या इनामवस्ती येथील अर्चना अनिल गाढवे यांच्या घरातून कपाटातील ६० हजार रुपयांचे दागिने व ५ हजार रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना दि. ६ ते ७ रोजी च्या दरम्यान घडली आहे. ही चोरी घरात घरकाम करणारी महिला हिने केली असल्याची तक्रार अर्चना गाढवे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.७ रोजी फिर्यादी अर्चना गाढवे यांच्या भावकीतील नातेवाईकांची लग्न असल्याने (दि. ६)रोजी दुपारच्या वेळी फिर्यादी हिने तिच्या कपाटातील लॉकर मधील दागिने मधून ६० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र व पाच हजार रुपये रोख रक्कम काढून लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. त्यानंतर दिनांक 7 रोजी त्या लग्नासाठी जायचे असल्याने लाकडी कपाटाचे ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने पैसे पाहिले असता त्यांना ते मिळाले नाही त्यानंतर तिने घरामध्ये सर्वत्र शोध घेतला असता ते सापडले नाही याबाबत तिने घरातील लोकांना विचारले असता त्यांनीही या बाबत काही माहीत नसल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी हिने त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेला विचारले असता तिने समाधानकारक उत्तरे दिले नाही. त्यामुळे हे दागिने तीनेच चोरी करून नेले असल्याचे फिर्यादीने तक्रारीत सांगितले आहे. याबाबत गाढवे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleदावडी ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान
Next articleसुजाता पवार यांच्या कल्पनेतून ‘महिला दिनानिमित्त’ निरक्षर महिलांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग सुरु