दावडी ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान

राजगुरूनगर- जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून दावडी(ता.खेड) ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या काळात अहोरात्र काम करण्याच्या महिलांचा सन्मान करून मिठाई देऊन साजरा करण्यात आला.

या वेळी आरोग्यसेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायतीच्या महिला सेविका, व गावात विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम यांनी या वेळी महीला दिनानिमित्ताने मार्गदर्शन केले.

या वेळी पोलीस पाटील आत्माराम डुंबरे,ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, अनिल नेटके हिरामण खेसे,मारुती . बोत्रे, ग्रामपंचायतीच्या सदस्या राणी इंबरे, माधुरी खेसे,पुष्पा होरे, धनश्री कान्हुरकर, संगीता होरे,ग्रामसेवक तानाजी इसवे आदी उपस्थित होते.

Previous articleडोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले
Next articleघोडेगाव येथे घरातून ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र व ५ हजार चोरीला ; घरकाम करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार