डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले

प्रमोद दांगट, निरगुडसर

मंचर गावच्या हद्दीत असलेल्या जुना चांडोली रोडवर चांडोली बुद्रुक येथील लोहारकाम करणारे ज्ञानेश्वर मोहन पवार यांना त्यांच्याच ओळखीतील दोघांनी तोंडावर मिरची पूड टाकून लुटण्याची घटना (दि.६) रोजी घडली आहे. या बाबत ची फिर्याद ज्ञानेश्वर मोहन पवार ( रा.चांडोली बुद्रुक ता.आंबेगाव ,जि.पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ज्ञानेश्वर पवार हे लोहारकाम करत असून त्यांच्या कडे असलेल्या दोन म्हशी ते विकण्यासाठी दि.६ रोजी चाकण येथील जनावरांच्या बाजारात गेले होते .त्या वेळी त्यांना त्यांच्या ओळखीचे पोपट महादु पवार ( रा. पिंपळगाव ता. आंबेगाव जि. पुणे ) व सुरेश महादु चव्हाण ( रा. कार्ला फाटा लोणावळा ) हे दिसले होते. फिर्यादी याने आपल्या दोन म्हशी ७० हजार रुपयांना विकून ते पुन्हा चांडोली येथे घरी निघाले मंचर येथे टेंपोतुन उतरल्यानंतर ते पायी चालत जुना चांडोली रोड ने जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर पोपट महादु पवार व सुरेश चव्हाण हे दोघे आले व फिर्यादी यांच्या जवळ गाडी थांबवून पोपट पवार यांनी त्याच्या खिशातील मिरची भुकटी फिर्यादीच्या तोंडावर मारत त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर सुरेश चव्हाण याने मोटरसायकलच्या सीट खाली ठेवलेला लोखंडी कोयता काढून पैसे दे नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी दिली व फिर्यादीच्या शर्टाच्या खिशात हात घालून खिशातील ७० हजार रुपये काढून घेतले. याबाबत ज्ञानेश्वर मोहन पवार यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर ए.एस.जाधव करत आहे.

Previous articleआंबेगाव- पंचायत समितीमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सखी कक्ष स्थापन
Next articleदावडी ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान