प्रकाशशेठ धारीवाल हे राजकारणा पलिकडचे सामाजिक प्रश्नांची जाणीव असलेले नेतृत्व- बांंधकाम सभापती अभिजीत पाचर्णे

अमोल भोसले,उरुळी कांचन

सामान्य व्यक्तीला संधी देऊन त्यांचे कर्तुत्व निर्माण करणारा नेता दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच सर्वेसर्वा उद्योजक शिरुर नगरीचे भाग्यविधाते सभागृह नेते प्रकाशशेठ धारीवाल यांचा वाढदिवस याचे औचित्य साधून शिरुर नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती नगरसेवक अभिजीत गणेश (तात्या) पाचर्णे म्हणाले की सर्वात कमी वयात मला शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रकाशशेठ धारीवाल यांनी नगरसेवक पदासाठी संधी दिली. ज्याप्रमाणे दगडापासून मूर्ती तयार होते, त्याप्रमाणे दानशूर व्यक्तिमत्व व आमचे सर्वेसर्वा उद्योगजक प्रकाशशेठ धारीवाल यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.

शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर सर्वात कमी वयाचा नगरसेवक व सभापती, बांधकाम समिती पदी काम करण्याची संधी त्यांनी दिली.

प्रकाशशेठ धारीवाल हे शिरुर नगरीच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात, नवनवीन योजना, उपक्रम हे नगरपालिकेच्या माध्यमातून राबवीत असतात. दानशूर उद्योगजक शिरूर नगरीचे भाग्यविधाते सभागृहनेते प्रकाशशेठ धारीवाल यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

Previous articleसामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचे आमदार निलेश लंके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आळंदी शहरात असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश