सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचे आमदार निलेश लंके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

अमोल भोसले,उरुळी कांचन

हार ,बुके नको , शालेय वस्तू देऊन गावागावात सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करावा आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

१० मार्च रोजी माझा वाढदिवस असून या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्याची इच्छाच असेल तर वह्या, पुस्तके, कंपास पेटी, दप्तर, चप्पल जोड, गरिबांना कपडे, रुग्णांना वैद्यकीय मदत, वृध्दांना काठी वाटप करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिकांचे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या निमित्ताने सामाजिक दूरदृष्टी ठेवून निश्चितच शैक्षणिक गुणवत्ता असणाऱ्या मुलांना शिक्षण घेता येईल कारण परस्थितीमुळे आज अनेक मुले – मुली शिक्षण घेऊ शकत नाही हे वास्तव आहे.

Previous articleबकोरीच्या डोंगरावर निसर्गप्रेमी तरुणांकडून पक्षी प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था
Next articleप्रकाशशेठ धारीवाल हे राजकारणा पलिकडचे सामाजिक प्रश्नांची जाणीव असलेले नेतृत्व- बांंधकाम सभापती अभिजीत पाचर्णे