कोरेगाव भीमा येथे भरधाव वेगात ट्रकची ट्रॅव्हल बसला धडक ; बसचा चालक ठार

Ad 1

शिक्रापूर-  पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोरेगाव भीमा येथील चौकात टाटा कंपनीचा 1109 टेम्पो एम एच 11 ,ए. एल.2702 यावरील ड्रायव्हर महेशकुमार भानुदासराव दहिफळे (रा. कोलवाडी ता. अहमदपूर जिल्हा लातूर) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात डिवाइस वरील खांबाला धडकला त्याच वेळी चौकात चहा पाणी घेण्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल बस एम.एच.20 एल.0300 ला जाऊन ठोकला या जोरदार झालेल्या अपघातात बस मध्ये असलेले चालक मुईझोदीन मोहिनुद्दीन सय्यद (वय ५५, रा. क्रांती चौक औरंगाबाद) जागेवरच ठार झाला आहे. याबाबतची फिर्याद बस चा किन्नर साद हसन चाऊस यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सहायक फौजदार थोरात करीत आहेत