पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भजनी मंडळास साहित्य वाटप स्तुत्य उपक्रम — जि.प.सदस्य अभिजीत तांबिले

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे जिल्हा परिषदेने आज जिल्हा परिषदेच्या निधी मधून भजनी मंडळ साहित्याची योजना राबवली आहे. त्या निमित्ताने यामध्ये टाळ – मृदुंग, हार्मोनियम आणि पखवाज अशा वस्तूंची यामध्ये वाटप केले आहे. या निमित्ताने या साहित्याचा उपयोग आज गावांमधील हरिनाम सप्ताहतील वारकरी संप्रदायातील वारकरी असतील तसेच अंत्यविधीसाठी सुद्धा याच साहित्यांचा उपयोग होतो. आज या निमित्ताने लहान मुलांनासुद्धा आज गावागावांमध्ये भजनाची आवड निर्माण होत चाललेली आहे आणि यामध्ये जर विचार केला तर महिलांचे वारकरी संप्रदायामध्ये सामील होण्याचे प्रमाण चांगले पद्धतीने वाढत आहे.

अशा पद्धतीची चांगली प्रेरणा आज पुणे जिल्हा परिषद आज राबवत आहे. गावामधील युवक वर्ग हा वारकरी संप्रदायाकडे ओळत चाललेला आहे आणि आज कौतुक आहे ते आमच्या जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीनकर करत आहेत. त्यांच्या या प्रयत्ना मधून आज आमच्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये वारकरी संप्रदाय यांना गावागावांमध्ये भजनी मंडळ साहित्याचे वाटप केले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले यांनी सांगितले.

ही योजना आम्ही जिल्हा परिषद सदस्य या नात्याने माझ्या मतदारसंघांमध्ये १) शिवशंभो भजनी मंडळ पिठकेश्वर, २) शिव महादेव भजनी मंडळ खबाले वस्ती , महादेवनगर (शहा) ३)जय हनुमान भजनी मंडळ जाधव वस्ती , तरंगवाडी ४) संत तुकाराम भजनी मंडळ,गोखळी ५) भांगे-ननवरे वस्ती भजनी मंडळ ,तरटगांव या गावांमध्ये चांगल्या पद्धतीने पोचवण्याचं काम केले असल्याने आज जिल्हा परिषद मतदार संघामधिल सर्व वारकरी संप्रदायामध्ये आनंदात वातावरण हे निर्माण झालेला आहे याचा मला आनंद आहे.

Previous articleकोरेगाव भीमा येथे भरधाव वेगात ट्रकची ट्रॅव्हल बसला धडक ; बसचा चालक ठार
Next articleजुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊसतोड मुकादमांकडून ४७ लाखांची फसवणूक : सात जणांवर गुन्हा दाखल